Headlines

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला एक महिन्यापूर्वीच लागली होती बंडाची खबर, मातोश्रीतून हालचालच नाही? मोठी अपडेट समोर

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला एक महिन्यापूर्वीच लागली होती बंडाची खबर, मातोश्रीतून हालचालच नाही? मोठी अपडेट समोर
ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला एक महिन्यापूर्वीच लागली होती बंडाची खबर, मातोश्रीतून हालचालच नाही? मोठी अपडेट समोर


उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. ते लवकरच वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. उद्या पक्षाने खासदारांची बैठक बोलावली आहे. सर्व खासदारांना शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. आता उद्या या बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार? यावरून सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हे सर्व आपल्याला एक महिन्यापूर्वीच माहिती होतं असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले खैरे? 

ज्या शिवसेनाप्रमुखांनी ही शिवसेना मराठवाड्यात रुजवली तीन  तीन खासदार निवडून गेले.
उद्धव साहेबांनी या तिघांचा पण प्रचार केला.  त्यांना निवडून आणलं, पण त्यांनी उद्धव साहेबांचासुद्धा घोर अपमान केला. त्यांनी वचन पाळलं नाही, कोणी आई वडिलांची शपथ घेतली होती, कोणी साईबाबांची शपथ घेतली होती, पण यांच्या शपथेवर विश्वास कसा ठेवणार? असा सवाल यावेळी खैरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना खैरे यांनी म्हटलं की,  या  गटाला मी सांगेल की तुम्ही उद्धव ठाकरेंचे झाले नाहीत, त्यांचे कधी होणार? तुम्ही त्यांना पण कधीतरी धोका देणार. हा सगळा प्रकार पैशाचा आहे, एक महिना अगोदरच मला माहीत झालं होतं फूट पडणार आहे, सहा जण जात आहेत. अशी फाटाफट करून तुम्ही तुमचं बळ वाढवत आहात, मात्र बळ वाढवून फायदा नाही हे खोटे बळ आहे.  शिवसैनिक चवताळून उठतो आम्ही सगळे चवताळून उठलो आहोत.  91 ला भुजबळ हे पंधरा लोकांना घेऊन फुटले होते, तेव्हाही आम्हाला वाईट वाटलं होतं, आताही वाटत आहे.  मात्र शिवसैनिकांनी संघर्ष केला आहे, असंही यावेळी चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *