Headlines

आता UPI आणि ATM मधून काढा पैसा… EPFO 3.0 विषयीची मोठी अपडेट वाचली काय?

आता UPI आणि ATM मधून काढा पैसा… EPFO 3.0 विषयीची मोठी अपडेट वाचली काय?
आता UPI आणि ATM मधून काढा पैसा… EPFO 3.0 विषयीची मोठी अपडेट वाचली काय?


EPFO 3.0 विषयीची मोठी अपडेट Image Credit source: tv9 news network

EPFO PF Withdraw ATM And UPI: केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटना लवकरच डिजिटल बदल करणार आहे. EPFO 3.0 अंतर्गत PF शी संबंधित अनेक सेवा पूर्णपणे डिजिटल आणि अधिक गतिशील करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे सदस्यांना, कर्मचारी भविष्य निधी (EPF) खात्यातील रक्कम UPI आणि ATM द्वारे लवकरच काढता येईल. सध्या ही सुविधा सुरू झालेली नाही. पण ईपीएफओची सेवा लवकरच रोलआऊट करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसूख मांडविया यांनी यासंबंधीची मोठी अपडेट दिली आहे. त्यानुसार, EPFO 3.0 ची चाचणी पूर्ण झाली आहे. आता या सेवेची लाँचिंगविषयीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पण सरकारकडून ही सेवा कधी लाँच करण्यात येईल याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

UPI आणि ATM मधून कसा मिळणार पैसा?

EPFO 3.0 लागू झाल्यानंतर कर्मचारी त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात पीएफची रक्कम थेट हस्तांतरीत करू शकतात. त्यासाठी UPI आणि ATM हे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. सध्या PF रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यात बराच वेळ जातो. पण नवीन यंत्रणेमुळे हा कालावधी वाचेल. नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर कागदी कार्यवाही कमी होईल आणि पैसा काढण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होईल. यामुळे कर्मचाऱ्यांना निकडीच्यावेळी बचतीतून काही रक्कम काढता येईल.

किती PF काढता येईल?

EPFO च्या नवीन प्रस्तावानुसार, पात्र सदस्य हे एकूण EPF खात्यातील शिल्लक रक्कमेतील 50% ते 75% पर्यंतचा वाटा काढू शकतात. अर्थात याविषयीचा अंतिम निर्णय आणि अटी-शर्तींची घोषणा होणे अद्याप बाकी आहे. तर पीएफ खात्यात कमीत कमी 25% वाटा कायम ठेवणे अनिवार्य होणार आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा नियम लागू असेल. दीर्घकालीन बचत हाच ईपीएफचा मुख्य उद्देश आहे.

ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढवून 5 लाख रुपये

सरकारने EPF दावे निकाली काढण्याची प्रक्रिया गतीशील करण्यासाठी ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढवली आहे. पूर्वी ही मर्यादा 1 लाख रुपये इतकी होती. आता ती वाढवून 5 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे दाव्यांचा निपटारा जलद होईल. सदस्यांना निकडीच्या वेळी पीएफची रक्कम काढण्यासाठी जास्त काळ लागणार नाही. नवीन व्यवस्थेमुळे तर अनेक दाव्यांचा निपटारा अगदी काही मिनिटात होईल. एटीएम आणि युपीआय प्रणालीच्या आधारे ही जलद रक्कम काढता येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *