Headlines

मोठा ट्विस्ट! शिंदे सेनेला धडकी, ओमराजे सोमवारी मातोश्रीवर? उद्धव ठाकरे यांना काय दिला निरोप? मोठी अपडेट समोर

मोठा ट्विस्ट! शिंदे सेनेला धडकी, ओमराजे सोमवारी मातोश्रीवर? उद्धव ठाकरे यांना काय दिला निरोप? मोठी अपडेट समोर
मोठा ट्विस्ट! शिंदे सेनेला धडकी, ओमराजे सोमवारी मातोश्रीवर? उद्धव ठाकरे यांना काय दिला निरोप? मोठी अपडेट समोर


ओमराजे निंबाळकर, मातोश्रीImage Credit source: एजन्सी

Omraje Nimbalkar visit Matoshree on Monday: आज दिवसभरात बड्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच उद्धव सेनेला दिलासादायक तर शिंदे सेनेची धडधड वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाराज असलेले खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्या उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल होणार आहेत. या बैठकीत ते त्यांची बाजू मांडतील, आज ओमराजे निंबाळकर हे त्यांच्या मतदारसंघात जनतेशी हितगुज करणार आहेत. त्यानंतर उद्या ते मुंबईत मातोश्रीवर दाखल होतील आणि त्यांची भूमिका मांडतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मातोश्रीवर येण्याचे आश्वासन

काल मध्यरात्री ओमराजे निंबाळकर आणि आमदार वरूण सरदेसाई, आमदार कैलास पाटील यांच्यात एक तासाहून अधिक काळ बैठक झाली. त्यात दोघांनी ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी केली. त्यांनी पक्ष न सोडण्याचे आवाहन केल्याचे समजते. कालच्या या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मातोश्रीवर येण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून वैयक्तिक बाजू मांडणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितल्याचे समजते. त्यामुळे आता एकूणच ऑपरेशन टायगरविषयी सस्पेन्स वाढला आहे. आता ओमराजे निंबाळकर हे उद्या 22 जून रोजी मातोश्रीवर जाणार का? ते शिंदे गटात जाणार की उद्धव सेनेतच थांबणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.

एक दिवस द्या -ओमराजे निंबाळकर

ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडू नये यासाठी उद्धव सेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. २० वर्ष ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला त्यांना न्याय मिळाला नाही. पक्ष प्रमुख यांचा निरोप आम्ही त्यांच्याकडे घेऊन आलो आम्हाला विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रति त्यांची जी भावना आहे ती आजही कायम आहे, ते पक्षात कायम राहतील असा आम्हाला विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप आम्ही ओमराजे निंबाळकर यांना दिला. त्यानुसार एक दिवस द्या असे ते म्हणाले अशी माहिती कैलास पाटील यांनी दिली आहे.

बैठकीच्या पूर्वी उद्धव ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद

खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिव मतदार संघात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडू नये, बैठकीला जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ओमराजे निंबाळकर शिवसेनेत जरी गेले तरी आम्ही उद्धव ठाकरें बरोबर एकनिष्ठ राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ठाकरे शिवसेनेचे काही कार्यकर्ते ओमराजे यांच्या पाठीमागे तर काही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आहे. ओमराजेंनी ठाकरे यांच्या पाठीमागे राहावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *