Headlines

शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं, ओमराजेंना मंत्रिपद मिळणार? गोवर्धनवाडीत घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?

शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं, ओमराजेंना मंत्रिपद मिळणार? गोवर्धनवाडीत घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं, ओमराजेंना मंत्रिपद मिळणार? गोवर्धनवाडीत घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?


शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे, हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, या बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं नाव देखील आहे, परंतु आता ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. मी अजून पक्ष प्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, मी आधी कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि त्यानंतर जो काही आहे, तो निर्णय घेईल असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज ओमराजे निंबाळकर यांचं फोनवरून  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं असून, ते सोमवारी ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळत आहे.  त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

कारण जर या सर्व खासदारांना शिवसेना शिंदे गटात विलीन व्हायच असेल तर दोन तृतियांश खासदारांची गरज आहे, शिवसेना ठाकरे गटाकडे एकूण 9 खासदार होते, त्यातील 6 म्हणजे दोन तृतियांश खासदारांनी बंड केलं, मात्र आता जर ओमराजे यांनी आपली भूमिका बदलली तर मात्र उर्वरीत खासदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता ओमराजे निबांळकर यांचं गाव असलेल्या गोवर्धनवाडीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. गोवर्धनवाडी येथील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांची तालुका निहाय कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू आहे. खासदार ओमराजे निंबाळकर जो निर्णय घेतील तो योग्यच घेतील,  त्यांच्या निर्णयाच्या सोबत आम्ही आहोत. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचा निर्णय योग्यच असेल. आम्हाला आशा आहे ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान एकीकडे सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा पहाता ओमराजे यांना मंत्रिपद मिळणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.  बंडखोर खासदारांपैकी एका खासदाराला मंत्रिपदाचं आश्वासन देखील देण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच सुत्रांकडून समोर आली होती, त्यामुळे मंत्रिपद भेटणार का? आणि समजा मंत्रिपद भेटलं तर या 6 खासदारांपैकी कोण मंत्री होणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *