
केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणाला धक्कादायक वल, सियाची जुनी पोस्ट चर्चेत
पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा केतनअग्रवाल याचा गेल्या आठवड्यात लोगहडावूरन खोल दरीत पडून मृत्यू झाला. 400 फूट खोल दरीत पाय घसरून केतना पडला, ज्यामुळे त्याल गंभीर दुखपात झाली. आणइ बचाव पथकाने धावाधाव करून त्याला सुरक्षित वर काढेपर्यंतच त्याचा जीव गेला होता. अवघ्या काही महिन्यांवर केतनचा विवाह होता आणि त्याचा मृत्यू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच (19 जून) त्याच्या होणाऱ्या पत्नीचा, सिया गोयल हिचा वाढदिवस होता. अवघा एक दिवस आधी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सगळेच हळहळले. मात्र आठवड्यभारनंतर या केसला एक धक्कादायक, नवं वळण मिळालं आहे, कारण पोलिस तपासात जे समोर आलं त्याने अनेकांना धक्का बसलाय. केतन याचा पाय घसरला नव्हे तर त्याला धक्का मारून दरीत ढकलण्यात आलं होतं आणि हे क्रूर कृत्य दुसरं तिसरं कोणी नव्हे तर त्याच्या होणाऱ्या पत्नीने, सिया हिने केल्याचं उघड झालं.
भावी पत्नीने काढला काटा
हो , हे खरं, सिया आणि तिच्या मित्राने मिळून केतनाचा काटा काढला. सियाच्या वाढदिवसानिमित्त ती केतन, कुटुंबीय आणि मित्रांसोबत फिरायला गेली होती. तिच्या वाढदिवसाचं महाबळेश्वरमध्ये जंगी सेलिब्रेशन होणार होतं, केतननने त्यासाठी खूप तयारीही केली होती. मात्र सियाच्या डोक्यात दुसराच प्लान घोळत होता. कुटुंबियांनी केतनशी ठरवलेलं लग्न तिला मंजूर नव्हतं, म्हणूनच तिने त्याचा काटा काढण्याता निर्णय घेतला, लोहगडावर फिरायला गेल्यावर तिने तिच्या मित्रासह मिळून केतनचा जीव घेतला.
मित्रासह मिळून केली हत्या
ते सर्वजण लोहगडावर फिरत होते, फिरता फिरता सगळे विखुरले, हीच संधी पाहून सियाने डाव साधला. ती आणि केतन सोबत होते, तेव्हाच सियाचा मित्रही तिथे आला आणि त्या दोघांनी संधी साधून केतनला धक्का दिला. शेकडो फूट दरीत केतन कोसळला आणि त्याचा जीव गेला. आधी सर्वांना हा अपघाती मृत्यूच वाटत होता, पोलिसांनीही आकस्मिक मृत्यूची नोद केली होती. मात्र जसजसा या घटनेचा तपास पुढे सरकत गेला, तसतशा धक्कादायक गोष्टी समोर आल्या. पोलिसांचा संशय बळावला आणि सीसीटीव्हीमध्ये एक तरूण हुडी घालून संशयास्पद फिरता दिसल्यावर तर पोलिसांचा संशय आणखी वाढला.
दिली गुन्ह्याची कबुली
अखेर त्यांनी सियाला चौकशी साठी बोलावलं, तिने प्रथन थातून मातूर उत्तर दिली, पण घटेच्या दिवशीच्या घटनाक्रमात, तिच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांनी तिला खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबूल केला. केतनशी लग्न करायचं नव्हतं, म्हणून मित्रासह मिळून त्याची हत्या केल्याचे तिने कबूल केल्याची माहिती समोर आली आहे. . त्यानंतर पोलिसांनी सिया आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतल्याचं समजतं.
सोशल मीडियावील जुनी पोस्ट व्हायरल
दरम्यान पोलिसांनी सियाला, केतनच्या हत्येच्या आरोपखाली अटक केल्यावर प्रचंड खळबळ माजली असून आता तिची सोशल मीडियावरील एक जुनी पोस्ट व्हायरल झाली आहे. 19 जूनला सियाचा वाढदिवस असतो, त्याच्या आदल्या दिवसीच केतनचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी सिया हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केतनसोबतचे काही फोटो, व्हिडीओ पोस्ट केले होते आणि एक लांबलचक पोस्टही लिहीत त्याच्या जाण्याबद्दल दु:ख व्यक्त केलं होतं.
“तू माझ्या वाढदिवशी मला सोडून गेलास… आपण लग्नाच्या इतके जवळ असताना तू मला का सोडून गेलास हे अजूनही मला समजत नाही. माझी अनेक स्वप्नं होती, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मला कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं, असं असतानाही तू मला का सोडून गेलास? Rest in Peace,” असा मेसेज सियाने लिहीला होता. खरंतर त्यावेळी केतनचा मृत्यू हा ट्रेकिंगदरम्यान अपघाताने, दरीत कोसळून झाला असंच मानलं जातं होतं, त्यामुळे सियाच्या या पोसटवर अनेकांनी कमेंट्स करत सहानुभूती व्यक्त केली होती.
मात्र आता आठवड्याभराने या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळणं मिळाल असून केतनचा मृत्यू अपघाती नव्हे तर कट रचून करण्यात आलेला खून असल्याचे समोर आल्याने अनेकांना धक्का बसला. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.