Headlines

वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्… संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?

शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलेल्या आक्रमक विधानामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. पत्रकारांनी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारल्यानंतर संजय दिना पाटील यांनी संताप व्यक्त करत वादग्रस्त भाषा वापरली. “परत इथे आलात तर मारून पाठवेन,” असे वक्तव्य त्यांनी पोलिसांसमोरच केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारची प्रतिमा खराब होऊ नये तसेच माध्यमांशी संवाद साधताना संयम राखण्याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे गटातही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. “त्यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली,” असे राऊत म्हणाले. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *