Headlines

India vs Bangladesh Womens T20 WC Score Updates and Highlights : टीम इंडियाची बांगलादेशवर 5 विकेट्सने मात

India vs Bangladesh Womens T20 WC Score Updates and Highlights : टीम इंडियाची बांगलादेशवर 5 विकेट्सने मात
India vs Bangladesh Womens T20 WC Score Updates and Highlights : टीम इंडियाची बांगलादेशवर 5 विकेट्सने मात


The liveblog has ended.

  • 25 Jun 2026 10:15 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : टीम इंडियाची बांगलादेशवर 5 विकेट्सने मात

    वुमन्स टीम इंडियाने निर्णायक सामन्यात विजय मिळवून 2 गुणांची कमाई केली आहे. भारताने बांगलादेशवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. बांगलादेशने भारतासमोर 137 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात 16.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं आणि  गुणांची कमाई केली.

  • 25 Jun 2026 09:52 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : ऋचा घोष आऊट, बांगलादेशचं जोरदार कमबॅक

    बांगलादेशने टीम इंडियाला चौथा झटका दिला आहे. राबियाने ऋचा घोष हीला एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाची 4 आऊट 98 अशी स्थिती झाली आहे.

  • 25 Jun 2026 09:44 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : यास्तिका भाटीया आऊट, भारताला तिसरा झटका

    बांगलादेशने भारताला तिसरा झटका दिला आहे. यास्तिका भाटीया आऊट होऊन माघारी परतली आहे. यास्तिकाने 18 बॉलमध्ये 23 रन्स केल्या.

  • 25 Jun 2026 09:32 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : शफाली वर्मा अर्धशतकानंतर आऊट, टीम इंडियाला दुसरा धक्का

    टीम इंडियाची ओपनर शफाली वर्मा आऊट झाली आहे  शफाली वर्मा अर्धशतक झळकावल्यानंतर आऊट झाली. शफालीने 34 बॉलमध्ये 53 रन्स केल्या.

  • 25 Jun 2026 09:27 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : शफाली वर्माचं अर्धशतक, टीम इंडियाची सामन्यावर घट्ट पकड

    टीम इंडियाची ओपनर शफाली वर्मा हीने 29 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. शफालीने 8 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर फोर ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. शफालीचं हे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील दुसरं अर्धशतक ठरलं. शफालीने याआधी नेदरलँड्स विरुद्ध पन्नास पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती.

  • 25 Jun 2026 09:24 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : शफाली वर्मा अर्धशतकाच्या दिशेने, टीम इंडिया मजबूत स्थितीत

    टीम इंडियाने सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडियाने 7 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 67 धावा केल्या आहेत. शफाली वर्मा 47 आणि यास्तिका भाटीया 11 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 25 Jun 2026 09:05 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : टीम इंडियाला मोठा झटका, स्मृती मंधाना आऊट

    बांगलादेशने भारताला पहिला आणि मोठा झटका दिला आहे. भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना आऊट झाली आहे. स्मृतीने 6 बॉलमध्ये 8 धावा केल्या.

  • 25 Jun 2026 09:03 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : टीम इंडियाची आश्वासक सुरुवात, सलामी जोडीच्या किती धावा?

    शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने भारताला आश्वासक सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघींनी 2 ओव्हरमध्ये बिनबाद 23 धावा केल्या आहेत.  शफाली 21 आणि स्मृती 1 धावेवर नाबाद खेळत आहे.

  • 25 Jun 2026 08:47 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात, शफाली-स्मृती मैदानात

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. भारताकडून शफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात आली आहे. बांगलादेशने भारतासमोर 137 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

  • 25 Jun 2026 08:36 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : बांगलादेशच्या 136 धावा, टीम इंडिया जिंकणार?

    बांगलादेश वुमन्सने टीम इंडियासमोर 137 धावांचं आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 136 धावा केल्या. त्यामुळे आता टीम इंडिया हे आव्हान किती ओव्हर राखून पूर्ण करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 25 Jun 2026 08:15 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : बांगलादेशला चौथा झटका, निगार सुल्ताना आऊट

    टीम इंडियाने बांगादेशला चौथा झटका दिला आहे.  बांगलादेशची कॅप्टन निगार सुल्ताना स्टंपिंग आऊट झाली. निगार सुल्ताना हीने 27 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. राधा यादव हीने अशाप्रकारे  वैयक्तिक दुसरी विकेट मिळवली

  • 25 Jun 2026 07:57 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : बांगलादेशला तिसरा झटका, शोभना मोस्तरी आऊट

    टीम इंडियाने बांगलादेशला तिसरा झटका दिला आहे. राधा यादव हीने शोभना मोस्तरी हीला दीप्ती शर्मा हीच्या हाती कॅच आऊट केलं आहे. शोभना मोस्तरी हीने 26 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.

  • 25 Jun 2026 07:43 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : जुएरिया फिरदोस आऊट, बांगलादेशला दुसरा झटका, नंदीनी शर्माला पहिली विकेट

    नंदीनी शर्मा हीने आपली पहिली विकेट घेत बांगलादेशला दुसरा झटका दिला आहे. नंदीनीने आपल्याच बॉलिंगवर जुएरिया फिरदोस हीला कॅच आऊट केलं. जुएरिया हीने 31 बॉलमध्ये 33 रन्स केल्या.

  • 25 Jun 2026 07:27 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : बांगलादेशच्या पावरप्लेमध्ये 40 धावा, टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात

    भारत-बांगलादेश वुमन्स सामन्यातील पहिल्या डावातील पावरप्लेचा खेळ संपला आहे. बांगलादेशने 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 40 धावा केल्या आहेत. तर टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात आहे.

  • 25 Jun 2026 07:11 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : बांगलादेशला पहिला झटका, दिलारा अख्तर आऊट

    रेणूका सिंह ठाकुर हीने भारताला पहिली विकेट मिळवून दिली आहे. रेणूकाने बांगलादेशच्या दिलारा अख्तर हीला आऊट केलं आहे. दिलाराने 8 बॉलमध्ये 4 रन्स केल्या.

  • 25 Jun 2026 07:03 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Score Updates : सामन्याला सुरुवात, बांगलादेशची सलामी जोडी मैदानात

    भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याला सुरुवात झाली आहे. बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशकडून दिलारा आणि फिरदोस ही सलामी जोडी मैदानात आली आहे. तर भारताकडून शफाली वर्मा पहिली ओव्हर टाकत आहे.

  • 25 Jun 2026 06:45 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Updates : बांगलादेश वुमन्स प्लेइंग ईलेव्हन

    बांगलादेश वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : दिलारा अक्टर, जुएरिया फिरदोस, शर्मीन अख्तर, निगार सुल्ताना (कर्णधार आणि विकेटकीपर), शोभना मोस्तरी, रितू मोनी, शोर्ना अक्टर, राबेया खान, नाहिदा अक्टर, शांजिदा अक्टर मेघला आणि मारुफा अक्टर.

  • 25 Jun 2026 06:38 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर आणि नंदनी शर्मा.

  • 25 Jun 2026 06:34 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Updates : बांगलादेशने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध निर्णय काय?

    बांगलादेशने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. बांगलादेशची कर्णधार निगर सुल्ताना हीने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज बांगलादेशला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 25 Jun 2026 06:15 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Updates : बांगलादेश वुमन्स टीम

    दिलारा अक्टर, जुएरिया फिरदौस, शर्मीन अख्तर, निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), शोभना मोस्तरी, रितू मोनी, शोर्ना अक्टर, राबेया खान, नाहिदा अक्टर, शांजिदा अक्टर मेघला, मारुफा अक्टर, फहिमा खातून, फरीहा त्रिस्ना, सुलताना खातून आणि ताज नेहार.

  • 25 Jun 2026 06:13 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया

    वुमन्स टीम इंडिया : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदनी शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, राधा यादव, क्रांती गौड आणि भारती फूलमाळी.

  • 25 Jun 2026 06:08 PM (IST)

    IND vs BANW T20 WC Live Updates : टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश निर्णायक सामना

    टीम इंडियासमोर आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बांगलादेशचं आव्हान आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *