Headlines

Monsoon Update : अचानक वातावरणात मोठा बदल, पुढचे 15 दिवस खूपच महत्त्वाचे; पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज काय?

Monsoon Update : अचानक वातावरणात मोठा बदल, पुढचे 15 दिवस खूपच महत्त्वाचे; पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज काय?
Monsoon Update : अचानक वातावरणात मोठा बदल, पुढचे 15 दिवस खूपच महत्त्वाचे; पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज काय?


Monsoon Update : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अनेक भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामाला वेग आला आहे. काही ठिकाणी मात्र अजूनही सरी बरसलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही पेरणी कधी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. असे असतानाच आता हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी पाऊस कधी येईल, याबाबत सांगितले आहे. राज्यामध्ये 25 जून ते 10 जुलैपर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. दुष्काळ पडणार नाही. फक्त पाऊस एकदाच सगळीकडे पडणार नाही. पाऊस टप्प्याटप्प्याने सर्व भागात पडणार आहे. कोकण किनारपट्टी ते मुंबई या भागात परत मान्सून सक्रिय होणार आहे, असे पंजाब डख म्हणाले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशीव या भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण या भागात 25 जूनपासून थोड्या सरी येतील. त्यानंतर 26 जूनपासून 10 जुलै रोजीपर्यंत या जिल्ह्यात दररोज पाऊस असेल. या भागातील शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.

दहा दिवसांत आणखी पाऊस पडेल

तसेच, विदर्भातही विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडेल. मराठवाड्यातही काही जिल्ह्यात पाऊस पडला. काही गावांत पाऊस पडलेला नाही. या भागातही जिथे पाऊस पडलेला नाही, तिथे पाऊस पडेल. उत्तर महाराष्टातील नंदूरबार, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातही येत्या दहा दिवसांत आणखी पाऊस पडेल. ओढे-नाले वाहतील. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांनी अगोदर जमिनीतील ओल तपासावी

सारांश सांगायचा झाला तर 25 जून ते 10 जुलै या काळात सगळीकडे पाऊस पडेल. पण हा पाऊस विखुरलेल्या स्वरुपात असेल. आज या जिल्ह्यात तर उद्या त्या जिल्ह्यात हा पाऊस असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदर जमिनीतील ओल तपासावी. त्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन पंजाबराव डख यांनी केले आहे.

ऑगस्ट महिन्यात दोन मोठे पाऊस होणार

बियाणे निवडत असताना शेजाऱ्यांना, नेतावाईकांना मदत करा. दुष्काळ पडणार नाही. जुलै महिन्यात जास्त पाऊस पडेल. ऑगस्ट महिन्यात दोन मोठे पाऊस होणार. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस झोडपून काढणार आहे. 13 नोव्हेंबर रोजी राज्यात थंडी येईल, असेही पंजाब डख यांनी सांगितले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *