Headlines

आधारकार्डवर मोफत मिळतोय AC? PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

आधारकार्डवर मोफत मिळतोय AC? PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
आधारकार्डवर मोफत मिळतोय AC? PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?


Free AC Scheme: सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. पंतप्रधानांनी नागरिकांसाठी मोफत एसीची घोषणा केल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्हाला आधारकार्डवर मोफत एसी मिळणार असल्याचं व्हिडिओतून सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर लोक देखील हा व्हिडिओ प्रचंड शेअर करत आहेत. खरंच सरकारने अशी कोणत्या योजनेची घोषणा केली आहे का, हे जाणून घेऊयात.

‘पीआयबी’ सरकारी वृत्त संस्थेने व्हायरल व्हिडिओमागील सत्य समोर आणलं आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका जाहीर सभेत बोलत आहेत. सरकार सर्व नागरिकांना मोफत एसी वाटणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलंय, असा दावा व्हिडिओतून केला जात आहे. यासाठी कागदपत्राचा पुरावा म्हणून केवळ आधार कार्ड गरजेचं असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर वेगळंच सत्य समोर आलं. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा सरकारी वृत्त संस्थेने केला आहे. ‘पीआयबी’नं ‘एक्स’वरील अधिकृत अकाऊंटवर हा पोस्ट करत व्हिडिओ खोटा असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी कोणतीही योजना जाहीर केली नसल्याचे सांगितले.

https://x.com/PIBFactCheck/status/2069751809607184720

व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

फॅक्ट चेक अहवालानुसार, व्हायरल होणारा व्हिडिओ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डीपफेक टूल्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलाय. पंतप्रधान मोदींचा आवाज एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलाय. लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी एआय निर्मित व्हिडिओचा आधार घेण्यात येत आहे.

वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून खोट्या व्हिडिओचा आधार घेतला जात आहे. या व्हिडिओसोबत एक रजिस्ट्रेश लिंक देखील दिलीज जाते. या लिंकच्या माध्यमातून आधार क्रमांक, बँक डिटेल्स किंवा ओटीपी मागून बँक खाते रिकामे केले जाऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ व्हाट्सअॅप ग्रुप किंवा सोशल मीडियावर शेअर न करण्याचे आवाहन केलं आहे.  योजनेच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचंही आवाहन करण्यात आलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *