Headlines

Vastu Shastra : हातात पैसाच टिकत नाही, मग शुक्रवारी घरी आणा ही खास वनस्पती, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर

Vastu Shastra : हातात पैसाच टिकत नाही, मग शुक्रवारी घरी आणा ही खास वनस्पती, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर
Vastu Shastra : हातात पैसाच टिकत नाही, मग शुक्रवारी घरी आणा ही खास वनस्पती, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर


अनेकदा आपल्यासोबत असं होतं की आपल्या हातात पैसाच टिकत नाही. आपण प्रचंड कष्ट करतो, पैसा कमावतो परंतु हातात आलेला पैसा लगेच खर्च होऊ जातो. त्यामुळे पैशांची बचत होत नाही. हा तुमच्या घरात निर्माण झालेल्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असू शकतो. ही नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अशा अनेक वनस्पती, झाडं आहेत, ज्यांना वास्तुशास्त्रामध्ये खूपच शुभ माण्यात आलं आहे. ही झाडं जर तुमच्या घरात असतील तर तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात, असं मानलं जातं. लकी बांबूचा देखील याच झाडांमध्ये समावेश होतो. ज्या घरात लकी बांबूचं झाडं असतं, त्या घराला आर्थिक स्थिरता प्राप्त होते असं मानलं जातं. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी हे झाड जर तुम्ही घरी आणणार असाल तर ते शुक्रवारीच घरी आणावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

शुक्रवारीच रोप का घरी आणावं?

तुम्ही अनेकांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये लकी बांबूचं झाडं पाहिलं असेल, या झाडामुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होते, तसेच तुमच्या भोवतालची सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा या वनस्पतीमुळे नष्ट होते. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं, ज्याचा फायदा हा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, नोकरीमध्ये होतो. तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये देखील मोठा लाभ होतो. घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.

हे रोप शुक्रवारीच घरी आणण्याचं मुख्य कारण म्हणजे शुक्रवार हा धनाची देवता लक्ष्मी मातेचा वार असतो. आणि या लकी बांबूचा संबंध देखील आर्थिक स्थितीशी आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही ही वनस्पती तुमच्या घरी शुक्रवारी आणता तेव्हा तुम्हाला त्याचा विशेष फायदा होतो. धनाची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहातो. तुमच्या घराची भरभराट होतो, तुम्हाला अनेक नव्या प्रगतीच्या संधी प्राप्त होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे बांबूचं रोप हे नेहमी शुक्रवारीच घरी आणावं असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *