
Ketan Agarwal Murder Case : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील लोहगड (Lohagad) हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याचा अनेक वर्षांचा इतिहास लाभला आहे. पण आता केतन अग्रवाल हत्याकांडानंतर किल्ल्यावर पोहोचणार प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे आणि तो प्रश्न म्हणजे ‘सिया पॉइंट’ कुठे आहे… जे अत्यंत दुर्दैवी आहे… केतन अग्रवाल याची हत्या करण्यासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी योजनेनुसार लोहगड किल्ल्यावर पोहोचले आणि 400 फूट खोल दरीमधेये केतनला ढकलून दिलं. अशात ज्या जागेवर ही घटना घडली, ती जागा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. जे अत्यंत धक्कादायक आहे.
ऐतिहासिक आणि स्वराज्याच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी असते. इतिहास प्रेमी, पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक किल्यावर येत असतात. पण आता लोहगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या तब्बल 25 टक्क्यांनी वाढली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, ज्या किल्ल्यावर मावळ्यांनी इतिहास घडवला, तेथे येणार पर्यटक आता ‘सिया पॉइंट’ कुठे आहे? असा प्रश्न विचारत आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुट्टीच्या दिवशी किल्ल्यावर 4 ते 5 हजार लोक येत. पावळ्यात पर्यटकांची गर्दी होते. पण केतन अग्रवाल या थरारक हत्याकांड़ानंतर पर्यटकांचा दृष्टिकोन बदलल्याचं चित्र आहे. पर्यटकांनी स्वतःच या जागेला ‘सिया पॉइंट’ असं नाव दिलं आहे… हा स्पॉट पाहण्यासाठी किल्ल्यावर जाणार्यांची संख्या अचानक 25 टक्क्यांनी वाढली आहे.
लोकांकडून व्यक्त केली नाराजी…
‘लोहगड विसापूर विकास मंचा’चे प्रमुख सचिन टेकावडे यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘अशा ऐतिहासिक आणि संस्कृतीक ठिकाणी अशी हत्येची घटना घडणं हे फ्क दुर्दैवी नाही तर, धक्कादयक देखील आहे. पण सोशल मीडियावर ज्याप्रकारे घटनेचे रिल्स आणि मिम्स व्हायरल होत आहेत, ते अधिक भयानक आहे…’ असं देखील ते म्हणाले.
केतन हत्या प्रकरणात नवीन अपडेट काय?
केतन अग्रवाल हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चेतन चौधरीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. घटनेच्या दिवशी त्याने कोणते कपडे घातले होते, हे जाणून घेण्यासाठी पोलीस त्याची चौकशी करत आहेत. पोलिसांनी त्याने वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे. घटनेचं रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी पोलीस लवकरच चेतन चौधरीला गुन्ह्याच्या ठिकाणी नेण्याची शक्यता आहे.