Headlines

Rohit Pawar | ‘आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न… रोहित पवारांच्या विधानाने खळबळ

Rohit Pawar | ‘आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न… रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
Rohit Pawar | ‘आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न… रोहित पवारांच्या विधानाने खळबळ


सध्या राज्यातील राजकारणात जलद घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते ठाकरे गटातील नेते असून थेट शिंदेंच्या संपर्कात आल्याने ठाकरे गटााला मोठा धक्का बसल्याचं सांगतिलं जात आहे. त्यांच्या उपसभापती पदासाठीचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. अलीकडेच ठाकरेंच्या गटातील सहा खासदारांनी शिंदेसेनेत पक्षप्रवेश केला. तर अनेक नेते विविध दावे करताना पाहायला मिळत आहेत. अशात एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगर कार्यरत आहे की काय? असं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं ज्या प्रकार सगळ्या पक्षांमध्ये फुटाफुटी पहायला मिळत आहे, तर आमच्या पक्षाचे खासदार फोडण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. मात्र मला खात्री आहे की आमचे सर्व खासदार निष्ठावंत असून कोणीच पक्ष सोडून जाणार नाहीत…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *