Headlines

Video : प्रसिद्ध नेत्याचं मास्क लावलं अन् अख्खी मोबाईल शॉपी लुटली, चोराच्या अजब चोरीचा व्हिडीओ व्हायरल!

Video : प्रसिद्ध नेत्याचं मास्क लावलं अन् अख्खी मोबाईल शॉपी लुटली, चोराच्या अजब चोरीचा व्हिडीओ व्हायरल!
Video : प्रसिद्ध नेत्याचं मास्क लावलं अन् अख्खी मोबाईल शॉपी लुटली, चोराच्या अजब चोरीचा व्हिडीओ व्हायरल!


Modi Mask : चोरी करण्यासाठी चोरटे कधी काय करतील याचा नेम नसतो. काही ठिकाणी तर थक्क करणाऱ्या चोऱ्या झालेल्या आहेत. आपले नाव समोर येऊ नये म्हणून चोरी करणारे वेगेवगळ्या प्रकारचे प्लॅन तयार करतात. सध्या मात्र चोरीचा असाच एक गजब प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरट्याचा प्रताप पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतला आहे. त्याने चोरी करताना चेहऱ्यावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मास्क लावला होता.

चेहऱ्यावर लावला मोदींचा मास्क

समोर आलेली ही घटना राजस्थानमधील भीलवाडा येथील करेडा येथील आहे. या ठिकाणी चोराने मोबाईलच्या दुकानात चोरी केली आहे. त्याने तब्बल पाच लाख रुपये मूल्य असलेले मोबाईल लंपास केले आहेत. ही चोरी करताना त्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला मास्क चेहऱ्यावर लावला होते. करेडा येथे मातेश्वरी मोबाईल शॉपीमध्ये ही चोरी झली आहे. चोरीची ही घटना समोर आल्यानंतर त्या भागात एकच खळबळ उडाली आहे. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चोरी नेमकी कशी केली?

मिळालेल्या माहितीनुसार मातेश्वरी मोबाईल शॉपचे मालक लक्ष्मण सेन हे मंगळवारी नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडायला गेले. सकाळी दुकानाचे शटर उघडे करताच समोरचे दृश्य पाहून ते हादरून गेले. मोबाईलचे कव्हर, दुकानातील इतर सामान अस्तव्यस्त पडलेले होते. मोबाईल असलेले बॉक्स सगळे रिकामेच दिसत होते. दुकानात पाय ठेवताच चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावले. आता पोलिसांनी या चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.

तब्बल 5 लाखांचे फोन चोरीला

चोराने मोबाईल चोरी करताना दुकानाचे शटर उचलले नाही. त्याने कुलूपही तोडलेले दिसत नव्हते. प्राथमिक तपासानुसार चोरटा हा छतावरून आत घुसला असावा असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, दुकानातून तब्बल 5 लाखांचे फोन चोरीला गेल्यामुळे लक्ष्मण सेन हतबल झाले आहेत. मोदी यांचा चेहरा असलेला मुखवटा लावून चोरी करणाऱ्या चोरट्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *