Headlines

FIFA: लाउडस्पीकर, गोंधळ आणि फटाके..! मेक्सिकोच्या चाहत्यांच्या इंग्लंड संघाच्या हॉटेलबाहेर धुडगूस, पण असं का?

FIFA: लाउडस्पीकर, गोंधळ आणि फटाके..! मेक्सिकोच्या चाहत्यांच्या इंग्लंड संघाच्या हॉटेलबाहेर धुडगूस, पण असं का?
FIFA: लाउडस्पीकर, गोंधळ आणि फटाके..! मेक्सिकोच्या चाहत्यांच्या इंग्लंड संघाच्या हॉटेलबाहेर धुडगूस, पण असं का?


FIFA: लाउडस्पीकर, गोंधळ आणि फटाके..! मेक्सिकोच्या चाहत्यांच्या इंग्लंड संघाच्या हॉटेलबाहेर धुडगूस, पण असं का?Image Credit source: Getty Images

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळाडूंचा मैदानात जितका लढा असतो, त्याच्या दुप्पट तिप्पट लढा त्या त्या संघाचे चाहते मैदानाबाहेर देत असतात. आपला संघ विजयी व्हावा यासाठी मैदानात उपस्थित राहून पाठिंबा देतात.  आपला संघ जिंकावा म्हणून काही करण्यास तयार होतात. अनेक जण वाटेल त्या अंधश्रद्धा पाळून संघाला विजय मिळावा यासाठी धावा करत असतात. असंच काहीसं चित्र फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाहायला मिळालं आहे. राउंड ऑफ 16 मध्ये यजमान मेक्सिकोचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना मेक्सिको सिटीत होणार असल्याने मेक्सिकोच्या चाहत्यांनी संघाच्या विजयासाठी वेगळीच रणनिती आखली आहे. इंग्लंडचा संघ जिथे थांबला आहे त्या हॉटेलबाहेर रात्रभर धिंगाणा घातला. लाउडस्पीकर, फटाके फोडून खेळाडूंना त्रास देण्याचा प्रयत्न केला.

भारतीय वेळेनुसार मेक्सिको आणि इंग्लंड यांच्यात 6 जुलै रोजी सकाळी साडे पाच वाजता राउंड ऑफ 16 सामना खेळला जाणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे सामना महत्त्वाचा असल्याने चाहत्यांनी भलतचं डोकं लावलं आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना अडचणीत आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. सामन्यात 90 मिनिटात काय होईल ते होईल. पण मेक्सिकोच्या चाहत्यांनी मैदानाबाहेर बाजी मारली आहे. इंग्लंडचा संघ मेक्सिकोच्या सांता फे हॉटेलमध्ये थांबला आहे. या हॉटेलबाहेर मेक्सिकन चाहत्यांनी रात्रभर धिंगाणा घातला. हजारोच्या संख्येने मेक्सिकन चाहते जमा झाले होते. त्यांनी ड्रम, बाजा, लाउडस्पीकर आणि फटाके फोडून इंग्लंडच्या खेळाडूंना त्रास दिला.

इंग्लंड संघाला मेक्सिकोचे चाहते त्रास देणार याची कल्पना आधीच आली होती. त्यामुळे इंग्लंडचा संघ नेमका कोणत्या हॉटेलमध्ये उतरला आहे याबाबत गुपित ठेवलं होतं. पण चाहत्यांनी इंग्लंडचा संघ कुठे थांबला ते शोधून काढलं आणि राडा केला. राउंड ऑफ 32 मध्ये मेक्सिकोचा सामना इक्वाडोरशी झाला होता. तेव्हाही चाहत्यांनी इक्वाडोरच्या खेळाडूंच्या हॉटेलबाहेर धुडगूस घालून त्रास दिला होता. तेव्हा इक्वाडोरच्या खेळाडूंनी पुरेशी झोप मिळाली नसल्याचं सांगत सामन्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं होतं. आता मेक्सिकन चाहत्यांनी इंग्लंड खेळाडूंना अगदी तसाच त्रास दिला. सामन्याच्या एक दिवस आधी खेळाडूंना मानसिक आणि शारीरिक त्रास झाला तर त्याचा परिणाम सामन्यात होईल. तसेच मेक्सिकोला विजय सोपा जाईल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *