
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी- 20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले. पहिल्या सामन्याचा निकाल पावसामुळे अनिर्णित राहिला तर दुसरा सामना हा इंग्लंडने जिंकला. जर भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल तर त्याना कोणत्याही परिस्थितीत उर्वरित सामने जिंकणे गरजेचे आहे. आता भारतीय संघ तिसरा सामना उद्या खेळणार आहे. सध्या भारतीय संघ एका नवीन बदलातून जात आहे ज्याचा सहाजिकच परिणाम पाहायला मिलत आहे. पण सर्व तगडे खेळाडू असूनही टीम इंडिया सामने जिंकत नाहीये, सूर्यकुमार यादवला टीम इंडियामधून बाहेर काढण्यामागे त्याचा फॉर्म कारणीभूत होता. पण किमान त्याच्या नेतृत्त्वात संघ सामने जिंकायचा. आता भारतीय संघ सामने गमावत आहे यावर सूर्यकुमार यादवने एक प्रतिक्रिया दिली आहे ज्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकला. मात्र, त्याला पुन्हा त्या ड्रेसिंग रूमचा भाग होण्याची संधी कधीच मिळाली नाही. दरम्यान, सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो भारतीय संघाबाबत एक मजेशीर विधान केले आहे .एका पापाराझीने माजी कर्णधाराला सांगितले की, मालिकेत त्याची उणीव भासत आहे. त्यावर सूर्याने उत्तर दिले, “सगळं काही ठीक चाललं आहे.” आयर्लंडविरुद्ध भारताच्या नुकत्याच झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावरील चाहत्यांनी याला एक टोमणा मानले.
Suryakumar Yadav cooked someone 🤣🔥
When a paps said, “We miss you in Team India,” listen to his reply…. 😂🔥 pic.twitter.com/toXDuoH2Vf
— Jara (@JARA_Memer) July 4, 2026
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, सूर्यकुमार यादव एका सलूनमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. हा व्हिडिओ बहुधा मुंबईतील असावा. पावसामुळे सूर्याला लवकर आत जायचे होते. पापाराझींचा एक जमाव त्याला घेरतो. त्यापैकी एक पापाराझी म्हणाला, “टी-20 मालिकेत तुमची उणीव भासत आहे.” सूर्या हसला आणि म्हणाला, “काय? सगळं काही ठीक चाललं आहे.” तिथे उपस्थित असलेले सर्वजण खळखळून हसले.
सूर्यकुमार यादवने टीम इंडियाच्या कामगिरीचे केलेले कौतुक चाहत्यांनी एक टोमणा म्हणून घेतले आहे. नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, आयर्लंड दौऱ्यावर भारताला 2-0 असा मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. या मानहानिकारक कामगिरीनंतर, भारतीय संघाला सर्वत्र टीकेला सामोरे जावे लागले. सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाखाली भारताने 52 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि त्यापैकी 42 सामने जिंकले. इतकेच नाही तर, त्याच्या कार्यकाळात भारताने एकही मालिका गमावली नाही.
सूर्यकुमार यादवसाठी टीम इंडियाचे दरवाजे जवळजवळ बंद झाले आहेत. खराब फॉर्ममुळे संघातून वगळण्यात आले. त्याने भारतासाठी 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 162 च्या स्ट्राइक रेटने 3272 धावा केल्या आहेत, ज्यात चार शतके आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या काही भारतीय खेळाडूंपैकी तो एक आहे.