Headlines

65 तास होऊनही मोशीत बचावकार्य सुरूच, कुटुंबियांचा आक्रोश, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली तब्बल..

65 तास होऊनही मोशीत बचावकार्य सुरूच, कुटुंबियांचा आक्रोश, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली तब्बल..
65 तास होऊनही मोशीत बचावकार्य सुरूच, कुटुंबियांचा आक्रोश, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली तब्बल..


पिंपरी चिंचवड येथील कचरा डेपो येथे थेट इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. गेल्या 65 तासापासून तिथे बचावकार्य सुरू आहे. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली 23 जण अडकले होते. त्यातील 8 जणांना अद्यापही या ढीगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलेले नाही. या कचऱ्याच्या डोंगरातून अनेक विषारी वायूचे उत्सर्जन होत आहे. त्यामध्येच झालेल्या पावसामुळेही बचावकार्याला बांधा आली. एनडीआरएफच्या जवानांना तोंडाला ऑक्सिजन लावून काम करावे लागत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. पण ढिगाऱ्याखाली असलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश मिळत नाही. कालच बाबत आढावा राज्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यांनी पालिका आयुक्तांसोबतही चर्चा केली. यादरम्यानच आता नातेवाईक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.

मोशी दुर्घटनेनंतर मृत आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना घेराव घालत तीव्र संताप व्यक्त केला. नातेवाईक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. 65 तासांपेक्षाही अधिक काळापासून त्यांचे कुटुंबिय ढिगाऱ्याखाली आहेत. यादरम्यान नातेवाईकांचा मोठा आक्रोश बघायला मिळाला. आम्हाला उत्तर द्या, या दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कोणाची?” असा सवाल करत नातेवाईकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

इमारतीला आधीच भेगा पडल्याचे फोटो दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना पाठवूनही कारवाई झाली नाही, तसेच बचावकार्य सुरुवातीला संथ गतीने झाल्याचा आरोपही त्यांनी यादरम्यान केला. या प्रकरणात अजून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. कचऱ्याच्या ढिगाच्या उंचीबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाले का, दोषींवर कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली.

मृत आणि जखमी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना न्याय आणि योग्य भरपाई मिळावी, अशीही त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. काल प्रकाश आंबेडकर देखील पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. काही यंत्रांचाही वापर केला जात आहे. मात्र, कचऱ्याचा ढिग मोठ्या असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *