Headlines

मोठी बातमी! अखेर ठरलं ? 2029 आधी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार?; बड्या नेत्याने आताच दिल्या शुभेच्छा

मोठी बातमी! अखेर ठरलं ? 2029 आधी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार?; बड्या नेत्याने आताच दिल्या शुभेच्छा
मोठी बातमी! अखेर ठरलं ? 2029 आधी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार?; बड्या नेत्याने आताच दिल्या शुभेच्छा


राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात येणाऱ्या काळात मोठ्या घडामोडी घडताना दिसणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या स्पर्धेत अमित शाह असले तरी फडणवीसांची बाजू अधिक उजवी असल्याचं बोललं जात आहे. देशातील विरोधी पक्षाच्या एका बड्या नेत्याने तर फडणवीस यांना पंतप्रधान पदासाठी आताच शुभेच्छा देऊन टाकल्या आहेत. फडणवीस हे 2029पर्यंत पंतप्रधान होतील, त्यांना आमच्या आताच शुभेच्छा आहेत, असं या नेत्याने म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता देशाच्या राजकारणात काय उलथापालथ होते आणि त्यात फडणवीस कुठे असतील हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनला 20 तारखेला सुरूवात होणार असून त्यापूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकतो, काही फेरबदल होऊ शकतात अशी चर्चा आहे.त्यात महाराष्ट्रातील काही नाव चर्चेत आहेत. देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाऊ शकतात अशी चर्चा सध्या सुरू आहे. ते 2029 पूर्वी जर पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर शुभेच्छा. 2029 नंतर मोदी किंवा इतर कोणी राहणार नाही, भाजपचं राज्य येणार नाही, त्यामुळे त्या आधी जे करायचं ते करा, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना आधीच शुभेच्छा देऊन टाकल्या.

काय म्हणाले राऊत ?

केंद्रीय मंत्रीमडळामध्ये काही महत्वाचे फेरबदल करण्यासंदर्भात केंद्रामध्ये काह विशिष्ट हालचाली सुरू आहेत . गेल्या अनेक काळापासून हे सुरू आहे. त्यात अर्थमंत्री बदलले जातील, कोणी म्हणतं परराष्ट्र व्यवहार मंत्री बदलू शकतात , कोणी म्हणत राजनाथ सिंह यांनाच घरी पाठवलं जाईल. अशा प्रकारच्या बातम्या चर्चेत आहेत. मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील असं सातत्याने म्हटलं जात आहे. मग केंद्रात जातील म्हणजे काय, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधानपदाची संधी मिळाली, तर मराठी माणूस झाला म्हणून महाराष्ट्राला आनंद होईल. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना त्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, असं राऊत म्हणाले.

कारण 2029 नंतरइथे भारतीय जनता पक्षाच राज्य येणार नाही. त्यामुळे जे काही करायचं आहे ते 2029 च्या आधीच तुम्ही करा. 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहतील. त्यामुळे दवेंद्र फडणवीस यांना 2029 पूर्वी ज्या काही हालचाली करायच्या आहेत, त्या त्यांनी करून घ्याव्यात, अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत असं संजय राऊतांनी सांगितलं.

फुटीर खासदारांवर पुन्हा टीकास्त्र

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यात महाराष्ट्रातील काही नाव आहे, ज्यामध्ये ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात सहभागी झालेल्या 6 खासदारांपैकी काहींना त्यात सहभागी केलं जाऊ शकतं, असं म्हटलं जात आहेत. त्यावर बोसताना राऊतांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. 20 तारखेला संसदेचं अधिवेशन सुरू होईल. आता मेरिटवरती पंतप्रधानपद किंवा मंत्रीपद या देशात, मिळण्याचे दिवस संपले आहेत. मेरीटवर, म्हणजे गुणवत्तेवर. आता हाडकं फेकली जातत, ती कोणापुढे फेकली जातात, तर ज्यांच्या गळ्यामध्ये मोदी -शहांनी पट्टा बाधला आहे, अशांनाच हाडकं दिली जातात. त्यामुळे आता कोणापुढे हाडकं फेकली जातील, मग तो मिंधे गट असेल किंवा आमच्याकडून फुटलेले जे सहा आहेत , कोणाच्या तोंडात हाडूक दिलं जातंय ते पाहू, असं राऊत म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *