राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने, कार्याध्यक्ष नितीन चव्हाण साहेब यांच्या उपस्थितित अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांची भेट घेऊन कामगारांच्या वर्गवारी संधर्भात येत्या 4 ते 5 दिवसात निर्णय नाही घेतला तर राष्ट्रवादी युनियन आपल्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करेल अशा सूचना दिल्या. राष्ट्रवादी युनियनने सर्व प्रथम कामगारांच्या वर्गवारी संधर्भात दिनांक 23/05/2022 रोजी सर्व शासन निर्णयासहित पत्रव्यवहार केला होता. मा. उपायुक्त प्रशासन यांनी सदर पत्राचा संधर्भ देऊन शहर अभियंता यांना कार्यवाही करण्याचा लेखी सूचना दिल्या होत्या. संबंधित विषयाला बगल देन्याचे काम संबंधित अधिकारी करत होते.
येत्या 5 दिवसात संबंधित विषयाबाबतीत निर्णय नाही घेतला तर आंदोलनाची दिशा तीव्र स्वरूपाची असेल अशी सूचना नितीन चव्हाण, नवी मुंबई अध्यक्ष संजय सुतार यांनी दिली. सदर मिटिंग मध्ये सर्व विभागातील कामगार प्रतिनिधि उपस्थितित होते.