Headlines

समान काम समान वेतन साठी महापालिका आयुक्तांची भेट आणि विषय लवकरात मार्गी लावण्यासाठी चर्चा केली…

                  आज दिनांक 06/05/2022 रोजी मा. आमदार शशिकांत शिंदेसाहेब व नितीन चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत आयुक्त अभिजित बांगर साहेब यांची भेट घेऊन 2007 च्या समान काम समान वेतन च्या नगर विकास विभागास सादर करण्यात येणाऱ्या प्रस्ताव बाबत चर्चा करण्यात आली.
             मा. आयुक्त बांगर साहेब यांनी 2007 साली जे समान काम समान वेतन लागू केले होते त्याच्या बेसवर समान काम समान वेतन चा प्रस्ताव तयार केला आहे.सदर प्रस्थाव मध्ये कोणत्याही त्रुटी राहू नये.कायम कर्मचारी यांना मिळणारे वेतन यामध्ये पूर्णतः समानता दिसायला हवी अशी सूचना कामगार प्रतिनिधी यांनी केली.
               मा. आमदारांनी आयुक्तांना सांगितले की येत्या 8 दिवसात तयार करण्यात आलेला समान काम समान वेतन चा प्रस्ताव नगर विकास विभागाला सादर करावा.
सदर मीटिंग मध्ये राष्ट्रवादी पदाधिकारी संदीप मोहिते,विशाल भिलारे, स्वप्नील घाडगे, अजय सुपेकर, चंद्रकांत चिकने, सुभाष ठाकूर, शंतनू पाटील,धुर्वा भोईर उपस्थित होते.

संजय सुतार
अध्यक्ष
राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन
नवी मुंबई
8082347721

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *