नवी मुंबई महानगरपालिकेतील करारपद्धतीवर(कंत्राट) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत अधिकारी/कर्मचारी व ठेकेदाराकडील कर्मचाऱ्याना वार्षिक किरकोळ रजा लागू करण्यात आली….
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वाढती लोकसंख्या विविध सेवा देताना पडणारा अतिरिक्त ताण,अपूरा कर्मचारी वर्ग व विविध विभागाची निकड विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ,कलम ५३ ( १ ) व ५३ ( ३ ) नुसार नवी मुंबई महानगरपालिकेत करारपध्दतीने ( कंत्राट ) तात्पुरत्या स्वरुपात नेमलेल्या अधिकारी कर्मचान्यांची नियुक्ती कमाल जास्तीत जास्त ६ महिन्याच्या ( १८० दिवस ) कालावधीकरीता करण्यात आलेली आहे.तसेच विविध विभागाने ठेकेदारा मार्फत कंत्राटी कामगारांची नियुक्ती केलेली आहे .
२. यासंदर्भात करारपध्दतीने ( कंत्राट ) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत अधिकारी / कर्मचान्यांना सहा महिन्यांच्या कालावधीकरीता कमाल ०४ किरकोळ रजा व ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना दिनदर्शिका वर्षात ( Calender year ) ०८ किरकोळ रजा लागू करण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन होती .
३ .त्यानुसार उपरोक्त संदर्भय महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग यांचेकडील राजपत्र असाधारण भाग आठ दि .०७.० ९ .२०१७ मधील CHAPTER IV 18 ( 1 व 2 ) च्या तरतुदीनुसार या परिपत्रकाव्दारे करारपध्दतीने ( कंत्राट ) निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत अधिकारी / कर्मचा – यांना सहा महिन्यांच्या कालावधी करीता ०४ किरकोळ रजा व ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना दिनदशिका वर्षात ( Calender year ) ०८ किरकोळ रजा अनुज्ञेय राहतील.
4. करारपध्दतीने ( कंत्राट ) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत अधिकारी / कर्मचा – यांसाठी किरकोळ रजेची मुदत फक्त सहा महिन्याचा कालावधीकरीता व ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांसाठी दिनदर्शिका वर्ष ( Calender year ) पर्यंत वैध ( Valid ) राहतील त्यानंतर अवेध ( LUnavalid ) होतील . सदर परीपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी .
अभिजीत बांगरसाहेब आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांनी सर्व विभाग प्रमुख त्यांच्या अधिनस्त असलेल्या ठेकेदारांना सदर परिपत्रकाची अंमलबजावणी करणेबाबत निदेश देण्यात आले आहेत.
संजय सुतार
अध्यक्ष
राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन नवी मुंबई