राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या मागणीला मोठे यश.मा.आयुक्तांनी कामगारांना त्यांच्या पदानुसार कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करणेबाबत लेखी आदेश दिलेले आहेत.
राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या मागणीला मोठे यश…
मा.आयुक्तांनी कामगारांना त्यांच्या पदानुसार कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करणेबाबत लेखी आदेश दिलेले आहेत. त्यामुळे कामगारांच्या पगारात अंदाजे 2 ते 3 हजारांची पगारवाढ होऊ शकते.
दिनांक २३/०५/२०२२ रोजी मा.आयुक्त अभिजित बांगरसाहेब व शहर अभियंता संजय देसाई साहेब यांची भेट घेऊन पत्र दिले कि नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना त्याच्या पदाच्या व अनुभवाच्या आधारे कुशल व अर्धकुशल मध्ये समाविष्ठ करण्यात यावे.
सदर पत्राची दखल घेऊन मा. आयुक्तांनी दिनांक १५/०६/२०२२ रोजी लेखी आदेश दिले कि सदर आदेशाची अंमलबजावणी करून व शासन निर्णयानुसार सदर पदे कुशल वर्गवारीमध्ये समाविष्ट करावी.
सदर ची मागणी युनियन चे नवी मुंबई अध्यक्ष संजय सुतार,उपाधय्क्ष अजय सुपेकर,बाळकृष्ण कदम,नितीन बांगर सरचिटणीस चंद्रकांत चिकणे,खजिनदार प्रशांत खोडदे,सहखजिनदार विजय बागडे,राजेश बगेरा,भूपेश तांडेल,गणेश भंडारी उपस्थित होते.