आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस, खूप काळ याची वाट पाहिली, ओडिशातून कंत्राटी भरती धोरण हद्दपार : नवीन पटनाईक
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. राज्यातून कंत्राटी धोरण हद्दपार करत असल्याचं नवीन पटनाईक म्हणाले.
ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. नवीन पटनाईक यांनी राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसदर्भात क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पटनाईक यांच्या या निर्णयानं राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन पटनाईक यांनी राज्यातील कंत्राटी भरतीचं धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करुन घेतलं जाईल, अशी घोषणा पटनाईक यानी केली आहे. पटनाईक यांच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे.
महाराष्ट्र सरकार असे निर्णय कधी घेणार कि फक्त दिशाभूल करणार कंत्राटी कामगारांची. 10 ते 15 वर्ष सेवा देऊन ही आपल्या महाराष्ट्र सरकारला कंत्राटी कामगारां बद्दल काही संवेदना नाही. निवडणुका आल्या कि फक्त आश्वासन देता येतात.