राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन ने कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित विषया संधर्भात आज दिनांक 07/11/2022 रोजी आयुक्त राजेश नार्वेकर साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली.
विषय खालीलप्रमाणे…
1) समान काम समान वेतन बाबत लवकरात लवकर मंत्रालयात मिटिंग लावून प्रस्थावास मंजुरी देण्या संदर्भात प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करावी.
सदर विषयाची दखल घेऊन आयुक्त महोदय यांनी दिनांक 09/11/2022 रोजी मंत्रालय येथे समान काम समान वेतन संधर्भात मिटिंग आयोजित केली आहे.
2) शहर अभियंता विभागातील टेक्निकल 1174 पदाना कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करण्या संधर्भातील विषया उपयुक्त (प्रशासन ) यांच्या कडे सादर केला आहे त्याला लवकरात लवकर तांत्रिक मंजुरी मिळावी. आयुक्त यांनी संबंधित विभागाला तशी सूचना दिली आहे.
3) उद्यान विभागातील बहुतांश कामगारांचा 2020 ते 2021 या कालावधीतील बोनस व रजेचे पैसे एन के शहा या कंत्राटदारने दिले नाहीत. त्या संधर्भात कंत्राटदारावर कारवाही करून कामगारांना त्यांचा हक्काचे पैसे लवकर मिळावे. आयुक्त महोदय यांनी सांगितले कि कंत्राटदाराच्या बिलातुन सदर रक्कम कपात केली आहे येत्या 8 दिवसात ती कामगारांना दिली जाईल.
सदर मिटिंग ला राष्ट्रवादी युनियन चे उपाध्यक्ष संदीप मोहिते नवी मुंबई अध्यक्ष संजय सुतार, सरचिटणीस चंद्रकांत चिकणे, उपाध्यक्ष अजय सुपेकर, बाळकृष्ण कदम, रमेश मांगले इतर कामगार उपस्थित होते.