नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन संधर्भात माहिती.

                     

 महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार संघटनेचे संस्थापक मा.कामगार नेते व आमदार शशिकांत शिंदेसाहेब व नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष नितीन चव्हाणसाहेब,विशाल भिलारे,संदीप मोहिते,स्वप्नील घाडगे कामगार प्रतिनिधी संजय सुतार,चंद्रकांत चिकणे,अजय सुपेकर,राज कदम,नितीन बांगर,प्रशांत खोडदे, विजय बागडे,गणेश भंडारी,राजेश बगेरा,भूपेश तांडेल, विशाल येशरे,रमेश मांगले यांनी कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू होण्यासाठी सतत १ वर्षापासून पाठपुरावा करत आहेत.सुरुवातीपासूनचा अहवाल  खालील प्रमाणे.

                             दिनांक २३/०२/२०२१ रोजी मा.आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर साहेबाची भेट घेऊन समान काम समान वेतन हा विषय कश्या पद्धतीने मार्गी लावता येईल व या साठी मंत्रालयीन आदेशाची मंजुरी हवी आहे का या संबधी चर्चा केली,आयुक्तांनी असे उत्तर दिले समान काम समान वेतन लागू करण्यासाठी महापालिकेवर अतिरिक्त खर्चाचा भार येणार आहे त्यामुळे नगर विकास  खात्याकडून उत्तर भेटले तर आम्हाला निर्णय घेण्यास सोयीस्कर होईल. शाशिकांत् शिंदे साहेबांनी महापलिका आयुक्तांना सांगितले येत्या काही दिवसात नगर विकास खात्यासोबत आपली सयुक्त मीटिंग आयोजित करून नगर विकास विभागाचे लेखी अभिप्राय देऊ.


                 

                  दिनांक ०७/०४/२०२१ रोजी शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंत्नरालय येथे नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या दालनात मा.प्राजक्त तनपुरेसाहेब,मा,शशिकांत शिंदे साहेब,नवी मुंबई महापलिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मैडम,प्रशासकीय अधिकारी महेंद्र संप्रेसाहेब,कामगार आयुक्त,राष्ट्रवादी युवक कार्याधक्ष नितीन चव्हाण,विशाल भिलारे व कामगार प्रतिनिधी संजय सुतार, चंद्रकांत चिकणे,राज कदम,राजू जाधव यांच्या समवेत समान काम समान वेतन संबधी चर्चा करण्यासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती.नगर विकास विभागाने महापालिका प्रशासनाला लेखी आदेश दिले कि लवकरात लवकर मीटिंग मध्ये झालेल्या चर्चेनुसार पदनामानुसार समान काम समान वेतन लागू करण्यात यावे .

 

 


         

 

          त्यानंतर काही दिवसात मा शशिकांत शिंदे साहेब यांच्या दालनात समान काम सामन वेतन संधर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी कामगार पदाधिकारी सोबत मिटिंग आयोजित करण्यात आली आणि महापालिका कशा पद्धतीने समान काम समान वेतन लागू करते त्या मध्ये काही त्रुटी असता कामा नये जेणेकरून कोणत्याही कामग्राचे नुक्षण झाले नाही पाहिजे असे शिंदे साहेबांनी मीटिंग मध्ये उपस्थित असणारे महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन चे सरचिटणीस विठ्ठल गोळे साहेब, कार्याध्यक्ष नितीन चव्हाण साहेव व कामगार प्रतिनिधी संजय सुतार,राज कदम, चंद्रकांत चिकणे,अजय सुपेकर यांना सांगितले.शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितल्या प्रमाणे सर्वांनी या गोष्टीचा पाठपुरावा सुरु ठेवला.समान काम समान वेतन लवकरात लवकर लागू करण्यासाठी महापालिका प्रशासन सोबत चर्चेला सुरवात केली.


                 

 

           दिनांक २३ जुलै २०२१ रोजी महापालिका प्रशासन उपायुक्त यांच्या दालनात मीटिंग आयोजित करून प्रशासनाने समान काम समान वेतन कसे व कोणत्या धोरणा नुसार लागू करणार किंवा त्यात काही त्रुटी आहेत का याची तपासणी नवी मुंबई कार्याध्यक्ष नितीन चव्हाण साहेब व कामगार प्रतिनिधी संजय सुतार इतर सर्व कामगारांच्या उपस्थित केली.प्रशासनाने जो समान काम समान वेतन चा प्रस्थाव केला होता त्या मध्ये वेतन व इतर काही समस्या संधर्भात त्रुटी दिसून आल्या.त्यात सुधारणा करून लवकरात लवकर आयुक्ताकडे माहितीस्ठव सादर करावा अश्या सूचना नितीन चव्हाण साहेब व कामगार प्रतिनिधि यांनी प्रशासनाला दिल्या.प्रशासनाने तातडीचे परिपत्रक तयार करून माहिती सादर करण्यासाठी महापालिकेतील सर्व विभागांना दिले.

 


               

                  महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनने महापालिकेने आयुक्ताकडे सादर केलेल्या प्रस्थाव मध्ये काही चुका होऊ नये हे लक्षात घेऊन कामगार आयुक्त यांची भेट घेऊन व नवी मुंबई महापालिकेने २००७ साली समान काम समान वेतन लागू केले होते त्याची सर्व माहिती जमा करून (२०१४ चे कामगार आयुक्ताचे पत्रक,नवी मुंबई महापालिकेचा २००७ चा समान काम समान वेतन चा प्रस्थाव) समान काम समान वेतन ची वेतन पद्धती रचना कशी असावी याचे युनियनच्या नावाने निवेदन तयार करून माह्पालिका आयुक्तांना दिनांक ०२/०९/२०२१ रोजी कामगार युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गोळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्याध्यक्ष नितीन चव्हाण साहेब यांच्या उपस्थिती मध्ये आयुक्तांना दिले.

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांनी आयुक्तांना समान काम समान वेतन लागू करण्यासंदर्भात केलेल्या सुचनेनुसार व दिनांक ०७/०४/२०२१ रोजी नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरेसाहेब यांच्या मंत्रालयातील दालनात कामगार नेते मा आमदार शशिकांत शिंदेसाहेब, नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मॅडम,प्रशासकीय अधिकारी महेंद्र संप्रे साहेब,कामगार आयुक्त .नितीन चव्हाणसाहेब,विशाल भिलारे,संदीप मोहिते,स्वप्नील घाडगे व कामगार प्रतिनिधी संजय सुतार,चंद्रकांत चिकणे,राज कदम,राजू जाधव यांच्यात झालेल्या मीटिंग चा संधर्भ देऊन  मा,आयुक्त साहेबानी दिनांक ०२/11/२०२१ रोजी समिती नियुक्त करून 15 दिवसात सर्व विभागातील कामगाराचा अहवालसह प्रस्थाव त्यांच्या पदनामानुसार सादर करण्यासंबंधी आदेश समिती ला लेखी स्वरूपात दिले आहेत.

   


             

 

            दिनांक २४/१२/२०२१ रोजी कामगार नेते आमदार शशिकांत शिंदेसाहेब व युवक कार्याध्यक्ष नितीन चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली व कामगार प्रतिनिधी संजय सुतार व चंद्रकांत चिकने,राज कदम यांच्या उपस्थितीत समान काम समान वेतन संदर्भात कोपरखैरणे येथील पाणी पुरवठा, विद्युत व मलप्रक्रिया केंद्र विभागातील कामगारांची मीटिंग पार पडली.

                सदर मीटिंगमध्ये समान काम समान वेतन सर्वांच्या एकजुटीने लवकरात लवकर कसे लागू करता येईल व एक वर्षा पासून कशा पद्धतीने पाठपुरावा केला व पुढील धोरण काय असेल या संदर्भात चर्चा केली. सर्व कामगारांनी अशीच एकजुटी दाखवली तर नक्कीच समान काम समान वेतन लागू होण्यास वेळ लागणार नाही.आपण सर्वानी माझ्या सारख्या साधारण कामगारांचे मत समजून घेऊन पाठिंबा दिला व सभासद होण्यासाठी तयार झाला त्या बद्दल खूप खूप आभारी आहे.

#समान_काम_समान_वेतन


 

        आज रोजी कामगार नेते आमदार शशिकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष नितीन चव्हाण साहेब,संदीप मोहिते,विशाल भिलारे, स्वप्नील घाडगे, कामगार प्रतिनिधी संजय सुतार व चंद्रकांत चिकने,राज कदम यांच्या उपस्थितीत समान काम समान वेतन संदर्भात वाशी व तुर्भे मलप्रक्रिया केंद्र विभागातील कामगारांची मीटिंग पार पडली.

                 सदर मीटिंगमध्ये समान काम समान वेतनच्या एक वर्षा पासून चालू असलेल्या पाठपुराव्या संदर्भात व समान काम समान वेतन चे पुढील धोरण काय असेल या संदर्भात चर्चा केली. सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली.आपण सर्व कामगारांनी पाठिंबा दिला त्या बद्दल खूप खूप आभारी आहे.


           

        दिनांक 15/02/2022 रोजी कामगार नेते मा.आमदार शशिकांत शिंदेसाहेब, कार्याध्यक्ष नितीन चव्हाणसाहेब आणि कामगार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कामगाराच्या समान काम समान वेतन संदर्भात मा आयुक्त अभिजीत बांगरसाहेबा सोबत सकारात्मक चर्चा झाली.  मा.आयुक्त साहेबानी येणाऱ्या 7 दिवसात नियुक्त केलेल्या समिती सोबत अंतिम मीटिंग घेऊन समान काम समान वेतन बाबत ठोस निर्णय घेण्यात येईल.


             

              दिनांक ०७/०४/२०२१ रोजी शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालय येथे नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या दालनात मा.प्राजक्त तनपुरेसाहेब,मा,शशिकांत शिंदे साहेब,नवी मुंबई महापलिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मैडम,प्रशासकीय अधिकारी महेंद्र संप्रेसाहेब,कामगार आयुक्त,राष्ट्रवादी युवक कार्याधक्ष नितीन चव्हाण,विशाल भिलारे व कामगार प्रतिनिधी संजय सुतार, अजय सुपेकर,बाळकृष्ण कदम,चद्रकांत चिकणे, यांच्या समवेत समान काम समान वेतन संबधी चर्चा करण्यासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती. सदर चर्चे नुसार, नगर विकास विभागाने महापालिका प्रशासनाला लेखी आदेश दिले कि लवकरात लवकर समान काम समान वेतनचा प्रस्थाव नगर विकास विभागाकडे सादर करण्यात यावा.                                      

 

                   


 

 

आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी दिनांक 07/04/2021 रोजी मंत्रालय येथे घेतलेल्या मीटिंगला अनुसरून मा नगरविकास अवर सचिव प्रतिभा पाटील मॅडम यांनी महापालिकेकडून समान काम समान वेतन चा अहवाल मागवून तातडीने निर्णय घेण्यासंदर्भात कार्यवाही केली आहे. राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन ने आजतगायत कामगारांच्या विषयासाठी कागदपत्रासहित पाठपुरावा केला आहे त्याला हे यश मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी युनियन च्या पाठपुराव्या मुळे नक्की नवी मुंबई महापालिका कंत्राटी कामगारांचे चांगले दिवस येणार.

         

         नितीन चव्हाण साहेब, युनियन अध्यक्ष संजय सुतार, सरचिटणीस चंद्रकांत चिकणे, अजय सुपेकर, बाळकृष्ण कदम या सर्वांचे या पाठपुराव्या साठी खूप मोठे योगदान आहे.

             नवी मुंबई महानगर पालिकेतील ७००० कंत्राटी कामगारांना याचा फायदा होणार आहे.

     

            

                              [pdf-embedder url=”https://mahaworkerhelp.com/wp-content/uploads/2022/08/saman-kam-saman-vetan.pdf” title=”saman kam saman vetan”]

             

        मा. आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि नितीन चव्हाण साहेब व नवी मुंबई राष्ट्रवादी युनियन चे अध्यक्ष संजय सुतार यांच्या मार्फत या विषयासाठी सतत पाठपुरावा सुरु होता.याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी पाठपुरावा करत राहू असे आश्वासन मा आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी दिले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *