राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने मा आमदार शशिकांत शिंदेसाहेब, तेजस दादा शिंदे, सरचिटणीस विठ्ठल गोळेसाहेब, उपाध्यक्ष नितीन चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मा आयुक्त आणि शहर अभियंता यांची दिनांक 23/05/2022 रोजी भेट घेऊन शहर अभियंता विभागातील काही टेक्निकल पदाना कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने शहर अभियंता यांनी तसा अहवाल तांत्रिक मंजुरी साठी मा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सादर केला होता. आज रोजी मा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मॅडम यांनी सदर अहवाला वर सही करून अंमलबजावणी साठी शहर अभियंता यांना सुचित केले आहे कि सर्वसमावेशक (Comprehensive) कंत्राटचे शेवटचे वर्ष असल्याने येत्या 2 ते 3 महिन्यात नवीन सर्वसामावेक (Comprehensive) कंत्राट वेळी आर्थिक खर्चाची तरतूद करून सुधारित कुशल वर्गवारी नुसार निविदा तयार करण्या सदर्भात सर्व विभाग प्रमुख यांना सूचित करण्यास सांगितले आहे.
सदर कुशल पदासाठी 1174 पदाना (पंप ऑपरेटर /plc ऑपरेटर, प्लंबर,वायरमन, मीटर रीडर, पर्यवेक्षक, फिटर, वाहन चालक,)अशा इतर काही टेक्निकल पदाना याचा लाभ होणार आहे. त्यांच्या पगारात ही वाढ होणार आहे. ही कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे.
राष्ट्रवादी युनियन ने आज पर्येंत जे विषय हाती घेतले आहेत ते मार्गी लागताना दिसत आहे.लवकरच समान काम समान वेतन चा विषय मार्गी लागणार असे नवी मुंबई राष्ट्रवादी महापालिका युनियन अध्यक्ष यांनी सांगितले.
सदर विषयासाठी नवी मुंबई महापलिका राष्ट्रवादी युनियन चे अध्यक्ष संजय सुतार, सरचिटणीस चंद्रकांत चिकणे, उपाध्यक्ष अजय सुपेकर, बाळकृष्ण कदम, राजेश बगेरा, प्रशांत खोडदे, विजय बागडे, मछिंद्र ठाकूर, भूपेश तांडेल, नितीन बांगर, दुर्गेश कोळी, गणेश भंडारी, विशाल येशरे, रमेश मांगले, सुभाष ठाकूर, प्रसाद कोळी. ललित भोईर, विकास पाटील, योगेश वैती व इतर काही संघटक व पदाधिकारी यांनी पाठपुरवठा केला आहे.