नवी मुंबई महानगरपालिकीचे जाहीर आवाहन..

नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाकरीता स्थलांतरीत करणे व कळंबोली येथे एकप्रेसवे पुलाखाली दिवा-पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करुन जलवाहिनी टाकणेसाठी आवश्यक कामे करणेत येणार आहे. तसेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे.

त्याअनुषंगाने सोमवार दिनांक १०/०४/२०२३ ते रोजी सकाळी १०.०० ते दुस-या दिवशी मंगळवार दि. ११/०४/२०२३ रोजीच्या सकाळी १०.०० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातुन होणारा पाणी पुरवठा २४ तासांकरीता बंद (Shut Down) ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे दि. १०/०४/२०२३ रोजीचा संध्याकाळचा व दि. १९/०४/२०२३ रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच दि. ११/०४/२०२३ रोजीचा संध्याकाळचा पाणी पुरवठा टप्या टप्याने कमी दाबाने सुरू होईल.

त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व कामोठे, खारघर नोड मधील नागरीकांना याव्दारे जाहीर आवाहन करण्यात येते की या कालावधीसाठी आवश्यक पाण्याचा साठा करावा. तसेच या कालावधीत “पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *