उद्यान विभागातील कंत्राटी कामगारांच्या अर्धकुशल वर्गवारी संधर्भात कामगार नेते रवींद्र सावंत यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली.

महापालिकेतील कंत्राटी कामगारांना राज्य शासनाच्या उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक २४.०२.२०१५ रोजीच्या आधीसूचनेनुसार व मा. सर्वसाधारण सभेच्या ठराव क्र.१२७२ दि.१५.०२.२०१७ नुसार किमान वेतन लागू केले आहे व कामगारांना कुशल, अर्धकुशल व अकुशल या वर्गवारीनुसार वेतन देण्यात येत आहे.

परंतु महापालिकेतील उद्यान विभागामध्ये शासन निर्णयाची पडताळणी न करता माळी या पदास अकुशल या वर्गवारी मध्ये समाविष्ट केले आहे ही बाब कामगारांवर अन्याय कारक असून त्यांच्या पगारात २५०० ते ३००० च्या आसपास तफावत दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या व श्रम आणि रोजगार मंत्रालय नवी दिल्ली दि. १९.०१.२०१७ च्या आदिसुचनेच्या अनुषगांने पद्नामानुसार कुशल व अर्धकुशल या पदासंदर्भात अतिरिक्त आयुक्त यांनी दि. १८.०१.२०२३ रोजी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सदर निर्णयानुसार शहर अभियंता यांनी सर्व विभागांना निर्णयाची अंमलबजावणी करण्या संधर्भात सूचना दिल्या आहेत.

परंतु उद्यान विभागातून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही व त्या संदर्भात संबधित विभाग बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे तरी आपण या विषयात सखोल लक्ष्य घालून यावर त्वरित कारवाई करण्यात सूचना संबधित विभागांना द्याव्यात अशी मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी केली.

मा. आयुक्त यांनी सदर विषया संधर्भात लवकरात लवकर कार्यवाही करून त्या कामगारांना अर्धकुशल वर्गवारी नुसार वेतन देण्याच्या संबंधित विभागाना सूचना दिल्या.

मोठी बातमी ! कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठीप्रस्थाव सादर करण्याचे निर्देश -विधानपरिषद उपसभापती

ओडिशातील ५७ हजार कंत्राटी कर्मचारी नियमित होणार,शासन अधिसूचना जारी….

राज्यातून कंत्राटी धोरण हद्दपार करत असल्याचं ओडिसा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाहीर केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *