महानगरपालिकेतील एनएमएमटीच्या अपघातग्रस्त वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत…

नवी मुंबई : नवी मुंबईतील कामगार अडचणीत सापडल्यास अथवा अपघातात जखमी झाल्यास त्याला व त्याच्या परिवाराला मदत करण्यासाठी, त्यांना चांगल्यातले चांगले उपचार मिळावेत यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत २४*७ या निकषावर सतत धावपळ करत असतात. एनएमएमटीच्या ठोक मानधन वाहकाला अपघात होऊन घरी बसण्याची वेळ आली. दोन महिने वेतन न भेटल्याने आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या वाहकाला कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून १२ हजार रूपयांचा धनादेश देत आर्थिक मदत केली आहे.

अकबर मुलानी हा एनएमएमटीचा वाहक अपघात झाल्यामुळे दोन महिन्यापासून घरीच होते. या कालावधीत त्यांना वेतनही मिळाले नाही. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलांनी व त्यांचा परिवार आर्थिक संकटात सापडला होता. ही बाब कामगार नेते रविंद्र सावंत यांना समजताच त्यांनी तात्काळ महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत मुलांनी यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांना नेरूळ सेक्टर दोनमधील इंटकच्या कार्यालयात कामगार नेते रविंद्र सावंत यांनी मुलांनी यांना बारा हजार रूपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सावंत तसेच संजय सुतार , राजेंद्र जाधव, अशोक व्यकंट बिराजदार, एन.एम.एम.टी युनिटचे अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कांतीलाल लक्ष्मण चांदणे तसेच नरेश माघाडे, गोविंद गायकवाड, रमेश गायकवाड, प्रकाश भोईर, सुनील दुर्लेकर, विजू राठोड, बाळू भालेराव, इस्माईल सय्यद, सलीम शेख, शाहूराज गायकवाड , धर्मराज वलांडे, रवींद्र सूर्यवंशी, ज्ञानोबा मलकापूरे, राजेश शेल्हाळकर, हरी गायकवाड, भरत झावरे, उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *