नवी मुंबई : कर्मचारी जखमी झाल्यावर त्याची विचारपुस करण्याचे सौजन्य प्रशासन, व्यवस्थापण तसेच कोणतीही कर्मचारी संघटना दाखल घेत नसतानाच नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागातील जखमी होवून घरी उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्याला घरी जावून आर्थिक मदत करण्यास इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने पुढाकार घेतला आहे. कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने ही मदत करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनातील परिवहन सेवेमध्ये ठोक मानधनावर कार्यरत असणारे वाहक कर्मचारी काशिनाथ त्रिंबक बावस्कर (वाहक क्रंमाक ३६८१) हे ७१ क्रमाकांच्या बसमधे वाहक म्हणून कर्तव्य पार पाडत असताना नावडे फाटा येथे बसचा टायर फुटून मोठा अपघात झाला . बसमध्ये जवळ पास ६० प्रवासी होते. त्या ठिकाणी त्या अपघातात वाहक काशिनाथ बावस्कर जखमी झाला, सदर बसही. सुपर मोबिलिटी कंपनीच्या ठेकेदार याची होती होती. जखमी वाहक काही दिवस हॉस्पिटल मध्ये होता.पायाला गंभीर दुखापत ज्यास्त झाल्याने सध्या ते घरी उपचार घेत आहेत. त्याला अजून पालिकेकडून पगार ही देण्यात आला नाही, त्यांची परिस्थिती नाजूक व हलाकीची आहे. 2 लहान मुलं शाळेत शिकत आहेत, लाईट बिल भरायला पैसे नाहीत.डॉक्टर कडे फी भरायला पैसे नाहीत, अशी अवस्था होती,
या जखमी कर्मचाऱ्याची कल्याण पडघा येथील खडवली गावी जावून कामगार नेते रविंद्र सावंत व सहकारी यांनी जखमी कर्मचारी काशिनाथ त्रिंबक बावस्कर यांची भेट घेत त्यांना कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांना १५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी रविंद्र सावंत यांच्यासमवेत महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड, कंत्राटी कामगार युनिट अध्यक्ष संजय सुतार, परिवहन विभाग युनिट अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कांतीलाल चांदणे, इस्माईल सैयद, गोविंद गायकवाड, नरेश मागडे, बाळु भालेराव, विजू राठोड, जितेश तांडेल, अभिषेक पथया, रतन वैद्य, राजेश शेलारकर आदी उपस्थित होते.
-
वास्तविक पाहता महापालिका परिवहन विभागाने जखमी कामगारांना बरे होईपर्यत, कामावर रुजू होईपर्यत भरपगारी रजा दिली पाहिजे यासाठी गेल्या काही वर्षापासून आम्ही कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रशासन दरबारी पाठपुरावा करत असल्याची माहिती रविंद्र सावंत यांनी दिली..