नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन बाबतीत धोरण निश्चित करून लवकरात लवकर कार्यवाही करण्याची इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी…
नवी मुंबई महानगरपालिकेत 8 हजार कंत्राटी कामगार कार्यरत असून त्यांना समान काम समान वेतन लागू करण्यासाठी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियन सातत्याने पाठपुरावा केला आहे.
उपरोक्त विषयान्वये आपणास दिनांक 19/03/2024 रोजी नगरपरिषद प्रशासन संचालन महाराष्ट्र राज्य यांनी समान काम समान वेतनसाठी धोरण निश्चित करून उचित कार्यवाही करण्याच्या सूचना आपणास दिल्या आहेत.
तरी आपण कंत्राटी कामगार (नियम व निर्मुलन) अधिनियम, १९७० अंतर्गत महाराष्ट्र कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) नियम १९७१ च्या नियम २५ (२) (बी) मधील तरतूदीनुसार कंत्राटी कामगारांना कायम कामगारांच्या बरोबरीने वेतन व इतर सर्व सोयी सुविधा देणे वावतचे धोरण निश्चित करून योग्य ती कार्यवाही करावी मागणी केली.
नवी मुंबई महानगरपालिकेत 8 हजार कंत्राटी कामगार कार्यरत असून त्यांना समान काम समान वेतन लागू करण्यासाठी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियन सातत्याने पाठपुरावा केला आहे.
उपरोक्त विषयान्वये आपणास दिनांक 19/03/2024 रोजी नगरपरिषद प्रशासन संचालन महाराष्ट्र राज्य यांनी समान काम समान वेतनसाठी धोरण निश्चित करून उचित कार्यवाही करण्याच्या सूचना आपणास दिल्या आहेत.
तरी आपण कंत्राटी कामगार (नियम व निर्मुलन) अधिनियम, १९७० अंतर्गत महाराष्ट्र कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) नियम १९७१ च्या नियम २५ (२) (बी) मधील तरतूदीनुसार कंत्राटी कामगारांना कायम कामगारांच्या बरोबरीने वेतन व इतर सर्व सोयी सुविधा देणे बाबतचे धोरण निश्चित करून योग्य ती कार्यवाही लवकरात -लवकर करावी अशी मागणी नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या जवळ महाराष्ट्र कर्मचारी युनियन यांनी आज केली आहे. कामगार नेते व अध्यक्ष श्री रविंद्र सावंत साहेब यांच्या पुढाकाराने आज आयुक्त साहेब यांची भेट कंत्राटी कामगार अध्यक्ष श्री संजय सुतार, महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव श्री मंगेश गायकवाड, उपाध्यक्ष श्री राजेंद्र जाधव व सहसचिव श्री दीपक गावडे आदी शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले.