राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा ७ गडी राखून पराभव केला. रोमांचक सामन्यात पंजाबकडून १४७ धावा केल्या.
राजस्थानने एक चेंडू बाकी असताना 7 गडी राखून लक्ष्य गाठले. संघाकडून यशस्वी जैस्वाल यांने 39 धावा केल्या आणि शिमरॉन हेटमायरने शेवटच्या षटकात 27 धावा केल्या. तत्पूर्वी, पंजाब किंग्जने 20 षटकांत 7 बाद गमावून बोर्डावर 147 धावा केल्या.पंजाबची सुरुवात खूपच खराब झाली. 102 धावांवर संघाने 6 विकेट गमावल्या होत्या. पंजाब कडून आशुतोष शर्माने 16 चेंडूत 31 धावा केल्या.पंजाब कडून जास्त धावा केल्या.केशव महाराज आणि आवेशने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. उर्वरित तीन गोलंदाजांना प्रत्येकी एक-एक विकेट घेण्यात यश मिळाले.राजस्थानने या पाचव्या विजयाची चव चाखली आहे. परंतु पंजाबला या मोसमात चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.