Anil Deshmukh Attack: दगडफेक, काचा फोडल्या अन् नंतर…; अनिल देशमुखांवरील हल्ल्यात नेमकं काय घडलं? समजून घ्या सगळा घटनाक्रम

Anil Deshmukh Attack: दगडफेक, काचा फोडल्या अन् नंतर…; अनिल देशमुखांवरील हल्ल्यात नेमकं काय घडलं? समजून घ्या सगळा घटनाक्रम


Timeline of Attack on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर समोर आलेल्या फोटो, व्हिडीओंमध्ये ते रक्तबंबाळ झाल्याचं दिसत होतं. प्रचार संपवून ते परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. नेमकं काय झालं याचा संपूर्ण घटनाक्रम समजून घ्या. 

नेमकं काय झालं?

अनिल देशमुख नरखेड येथील सांगता सभा आटपुन काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परतत  होते. यावेळी काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. 

‘आम्हाला घाबरवून…’, अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून पहिली प्रतिक्रिया

 

अनिल देशमुख यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतरचा व्हिडीओ समोर आला आहे. यात त्यांच्या गाडीसमोरील काचेवर एक मोठा दगड पडल्याचा दिसत आहे. गाडीवर फेकण्यात आलेल्या दगडामुळे समोरील काच फुटली आणि त्या काचेचे तुकडे समोर बसलेल्या अनिल देशमुखांच्या डोक्याला लागले. यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. 

सुप्रिया सुळेंचा संताप

प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.‌ ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

गुप्तचर विभाग झोपला होता का?

“एका सशक्त लोकशाहीत पारदर्शकपणे निवडणूक झाली पाहिजे. ज्याप्रकारे अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. शांततेच्या मार्गाने सर्वजण प्रचार करत होते. हा हल्ला झालाच कसा? सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. हा अन्याय आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर, लोकांवर असा हल्ला होणं दुर्दैवी आहे. सशक्त लोकशाहीत हे अस्वस्थ करणारं आहे. त्यांना आम्हाला घाबरवू शकतात असं वाटत आहे. पण आम्ही घाबरणार नाही,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

पुढे त्यांनी सांगितलं की, “माझं त्यांच्या सूनेशी बोलणं झालं. संपूर्ण कुटुंब घाबरलं आहे. ा भाजपाने आणि त्यांच्या मित्रपक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे?”.

“सरकारचं इंटेलिजन्स काय करत आहे? 50 वेळा सगळ्यांचे हेलिकॉप्टर, गाड्या तपासत आहेत. त्यात यांना काही मिळालं नाही. मग हल्ला झाला तेव्हा सरकार करत होतं. गृहमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल,” असंही त्या म्हणाल्या आहेत. 





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *