'निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे…'; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोला

'निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे…'; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोला


Maharashtra Assembly Election Sanjay Raut Reacts: विरारमधील विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुफान राडा झाला असून भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्वत: क्षितिज ठाकूर यांनी या हॉटेलमध्ये जाऊन भाजपाकडून पैसे वाटप सुरु असताना रंगेहाथ कार्यकर्ते आणि नेत्यांना पकडल्याचा दावा केला आहे. या प्रकरणानंतर बविआचे अध्यक्ष हिंतेंद्र ठाकूर यांनी ‘झी 24 तास’शी बोलताना, “तावडे 5 कोटी रुपये वाटण्यासाठी आल्याची माहिती मिळालेली,” असा दावा केला आहे. दरम्यान या राड्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

नेमकं घडलं काय?

क्षितीज ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते या हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. ‘बविआ’ने केलेल्या आरोपानुसार, या ठिकाणी कोणाला किती पैसे वाटले जाणार यासंदर्भातील डायऱ्याही सापडल्या आहेत. “राष्ट्रीय सरचिटणीसांना कायदा नियम माहिती नाही का? वाड्याला गेले तिकडून 5 कोटी रुपये घेऊन इकडे आले. त्यांच्या डायऱ्या मिळाल्यात, लॅपटॉप मिळालेत. त्यात सगळे हिशोब आहे. कोणत्या लायकीचे लोक आहेत हे? हे शिक्षणमंत्री होते आपले. यांना लाज शर्म वाटते की नाही?” असा सवाल हिंतेंद्र ठाकूर यांनी विचारला आहे. तसेच पुढे बोलताना हिंतेंद्र ठाकूर यांनी, “त्यांनी मला 25 फोन केले मला. अरे बाबा मला जाऊ द्या ना! चूक झाली, असं ते म्हणाले. यांच्या चुका माफच करत बासायच्या का?” असा सवाल उपस्थित केला. “हवं तर माझं फोन बूक तुम्ही चेक करु शकता,” असंही फोन केल्याचा दावा करताना हिंतेंद्र ठाकुर यांनी म्हटलं आहे. तसेच विनोद तावडेंनी, ‘झालं ते विषय संपवा,’ असं म्हटल्याचा दावा केला आहे. “त्यांनी लोकांसमोर येऊन लोकांना आणि पत्रकारांना उत्तरं द्यावीत, विषय संपेल. मी आता इकडे आलोय. आता बघतो,” असंही हितेंद्र ठाकूर म्हणाले.

राऊतांचा टोला

दरम्यान या राड्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर संजय राऊतांनी यापैकी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. “भाजपचा खेळ खल्लास,” असं म्हणत संजय राऊतांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या हॉटेलमधील व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला कॅप्शन देताना संजय राऊतांनी, “जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले. निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो,” असा टोला लगावला आहे. 

मागील काही दिवसांपासून सातत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरे करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या बॅगा हॅलिपॅडवर तपासण्यात आल्याचा संदर्भ राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे. दरम्यान, भाजपाचे हे सारे आरोप फेटाळले आहेत. 





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *