'फडणवीस आपली…', देशमुखांचा रक्तबंबाळ अवस्थेतील Video पाहून राऊतांचा संतप्त सवाल

'फडणवीस आपली…', देशमुखांचा रक्तबंबाळ अवस्थेतील Video पाहून राऊतांचा संतप्त सवाल


Maharashtra Assembly Election Anil Deshmukh Attack: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे. अनिल देशमुख नरखेड येथील सांगता सभा आटपुन काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परतत  होते. यावेळी काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरु असतानाच घडलेल्या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी तर थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत या हल्ल्यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

गाडीच्या बोनेटवर दगड

अनिल देशमुख यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतरचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये त्यांच्या गाडीच्या बोनेटवर मोठा दगड पडल्याचं दिसत आहे. गाडीवर करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे गाडीच्या विंडशिल्डची काच फुटली आणि काचेचे तुकडे लागून अनिल देशमुख जखमी झाले. देशमुख त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर या हल्ल्याची दाहकता समोर आल्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी रक्तबंबाळ अवस्थेत कारमध्ये बसलेल्या अनिल देशमुखांचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत थेट फडणवीसांना सवाल केला आहे.

राऊतांकडून थेट फडणवीसांना सवाल

“गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड खूनी हल्ला झाला. फडणवीस आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? हा राजकीय हल्ला आहे. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृह मंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो. शेम! शेम!” असं राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावरुन या घटनेचा निषेध केला आहे. “राज्याचे माजी गृहमंत्री व आमचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध! राज्यात कायदा व सुव्यवस्था केवळ कागदावर राहिली आहे. ऐन निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या गाडीवर असे जीवघेणे हल्ले होत असतील तर राज्य खरंच जंगलराजकडे वळला आहे, हे आता सिद्ध झालं आहे. महाराष्ट्राने अशी विकृती कधीच पाहिली नव्हती. विशेषत: नागपुरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात भाजप सपशेल झाली असून गुन्हेगारांना इथे बळ मिळाले आहे. या हल्ल्याची सखोल चौकशी होऊन आरोपींना लवकरात लवकर गजाआड करावे अशी आमची मागणी आहे,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

राऊतांची पोस्ट

आव्हाडांची पोस्ट

कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलीस

रोहित पवार यांनीही या घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “ज्येष्ठ नेते अनिल देशमुख साहेब यांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. यातून देशमुख साहेब हे लवकर बरे होतील, असा विश्वास आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलीस हल्लेखोर आणि त्यामागील मास्टरमाईंड यांच्या मुसक्या आवळतील, ही अपेक्षा,” असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात, “भाजपाच्या काळात…”

तर सुप्रिया सुळे यांनी, “निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुखांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे,” असं म्हटलं आहे.





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *