Eknath Shinde Resigned What Next Deepak Kesarkar Answered: विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबरोबरच मंत्रिमंडळ बसखास्त झालं असून आता शिंदे पुढील मुख्यमंत्र्याची निवड होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत मोजक्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत शिंदेंनी सकाळी साडेअकराच्या सुमारास आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर 232 जागा जिंकणाऱ्या महायुतीच्या सरकारचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? तसेच शिंदेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय असा प्रश्न उपस्थित होत असतानाच या प्रश्नांची उत्तरं शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच राजभवानातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहेत.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?
“मुख्यमंत्र्यांनी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार संभाळण्यास राज्यपालांनी सांगितलं आहे,” अशी माहिती शिंदेंच्या पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकारांना राजभवानाबाहेर पडल्यानंतर दिली. त्यानंतर पत्रकारांनी केसरकरांना, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारला. त्यावर केसरकरांनी, “प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. मात्र तिन्ही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय मोदी आणि शाह घेतील तो सर्वांना मान्य राहील,” असं उत्तर दिलं.
नक्की वाचा >> निवडणुकीनंतरचा राज्यातील सर्वात मोठा निर्णय! गृह खात्याने…; फडणवीसांची ‘ती’ भेट कारणीभूत
जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा तिघेही…
तसेच पुढे बोलताना, “मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागतो. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे,” असं केसरकर म्हणाले. त्याचप्रमाणे तिन्ही नेते दिल्लीला जाणार का याबद्दल केसरकरांकडे विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी, “जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा तिघेही दिल्लीला जातील. जर निरिक्षक पाठवला तर निरिक्षक इथे येतील. ही पक्षाची अंतर्गत बाब असून यावर मी काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही,” असं केसरकर म्हणाले.
नक्की वाचा >> राजकीय घडामोडींना वेग! रात्री 12.53 AM ला CM शिंदेंची पोस्ट; म्हणाले, ‘अशा पद्धतीने माझ्या…’
पुढे बोलताना, “तिन्ही (शिंदे, फडणवीस, अजित पवार) नेत्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलं आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने हे सरकार एकत्र काम करणार आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Shiv Sena leader Deepak Kesarkar says, “CM Eknath Shinde has submitted his resignation to the Governor and the Governor has appointed him as the caretaker CM till the new government is formed. Mahayuti leaders will sit together and discuss and go to… pic.twitter.com/aVenyQ0ovg
— ANI (@ANI) November 26, 2024
नवीन सरकार कधी सत्तेत येणार?
नवीन सरकार कधी स्थापन होणार याबद्दल विचारलं असता, केसरकरांनी, “येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल. पक्षाचे वरिष्ठ लवकरच निर्णय घेतली. भाजपाच्या गटनेत्याच्या निवडीसाठी लवकरच बैठक होणार आहे. त्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसून चर्चा करतील. मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन जो काही निर्णय घेतली त्यानुसार महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल,” असं सांगितलं. “एकनाथ शिंदे हे नाराज नसून त्यांनी ‘जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल,’ असंही केसरकर म्हणाले.