Mumbai News Today: लहान मुलं ही देवाघरची फुले असतात. मुलांना पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हसू येते. मात्र काही जणा मुलांचा वापर करुन पैसे कमवण्यासारखा निंदनीय प्रकार करतात. मुंबई पोलिसांनी अलीकडेच एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने तीन मुली आणि दोन मुलांची 1.5 लाख ते 3.8 लाख रुपयांपर्यंत विक्री केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी मुलांचा रंग, रुप याच्या आधारे मुलांची किंमत ठरवतात. त्यांना गरजु लोकांकडे सोपवतात आणि भरपूर पैसे उकळतात. यासाठी ते विविध प्रकारची हार्मोन्सची इंजेक्शन देतात जेणेकरुन ते सुंदर दिसतील.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ महिलांसह दहा आरोपींची नेटवर्क संपूर्ण देशभरात होणाऱ्या मानव तस्करीसोबत आहे. हे लोक फक्त मानवी तस्करीच नाही तर निःसंतान लोकांना शोधून त्यांच्याकडे चोरुन आणलेली मुलं सोपवतात. त्यासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करतात. तसंच, पीडितांना वेश्याव्यवसाय, भीक मागणे आणि अन्य दुष्कृत्यदेखील करायला लावतात. मुलींना हार्मोन्सचे इंजेक्शन देऊन त्यांना वयाच्या आधीच मोठ्या होतात नंतर त्यांची विक्री केली जाते. पोलिसांना या आरोपींकडून मानव तस्करींने पीडित मुलं, तरुण-तरुणी आणि वृद्धांची माहिती मिळाली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोऱ्या रंगाच्या मुलांची किंमत 4-5 लाख रुपयांपर्यंत घेतली जाते. तर, सावळ्या किंवा मध्यम रंग असलेल्या मुलांची किंमत 2 लाख ते 3 लाखापर्यंत घेतात. थोडक्यात रंग-रुपानुसार मुलांची किंमत ठरवली जाते. सावळ्या रंगाच्या मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले जाते तर दिव्यांग मुलांना भीक मागवण्यासाठी त्यांची 50 ते दीड लाखांत विक्री केली जाते. टोळक्यांच्या निशाण्यावर असे कुटुंब असतात जे मुलींच्या जन्मानंतर त्यांचा सांभाळ करण्यास तयार नसतात.
कसा झाला भांडाफोड
माटुंगा पोलिसांना दादरच्या टिळक ब्रिजच्या खालील फुटपाथावर एका महिलेने एका महिन्याच्या मुलीला एक लाखात विक्री केल्याची सूचना मिळाली. तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेच्या पतीला एका प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. त्याला जामिन मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची गरज होती. जे त्याच्याकडे नव्हते. त्यामुळं महिलेने त्यांच्या मुलीलाच एक लाख रुपयांत विकले. या प्रकरणाच्या चौकशीत आंतरराज्यीय महिला व मानवी तस्करीचे नेटवर्क असल्याचे समोर आले. हे नेटवर्क मुंबई, सांगली, कोल्हापूर, गुजरात, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकसह अन्य भागात पसरलेले आहे.