Elephanta Boat Accident: गेटवे ऑफ इंडियावरुन (Gateway of India) एलिफंटाला (Elephanta) निघालेली बोट दुर्घटनाग्रस्त झाली आहे. निलकमल नावाची फेरी बोट उरणजवळ (Uran) कारंजा (Karanja) येथे बुडाली. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 5 जण बेपत्ता आहेत. 80 प्रवाशांनी बाहेर काढण्यात आलं असून, चौघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान ही दुर्घटना नेमकी कशी झाली यासंदर्भात बोटीच्या मालकाने माहिती दिली आहे.
एलिफंटामधील दुर्घटनेचा Live व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद; आधी स्पीड बोटने धडक दिली अन् नंतर…
बोटीचे मालक राजेंद्र पट्टे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “बोट एलिफंटाला जात असताना तेथून नेव्हीची एक स्पीट बोट जात होती. त्यांनी बोटीला एक राऊंड मारला. परत गेल्यानंतर त्यांनी आमच्या बोटीला धडक दिली आणि दुर्घटना घडली”.
“3.15 वाजता बोट निघाली होती. बोटीत 80 लोक होते. बोटीची 84 लोकांची क्षमता आहे. पण ती 130 प्रवासी घेऊन जाऊ शकत होती. बोटीत लाईफ जॅकेट्स होते. सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यात आले होते. बोटीला धडक दिल्याने दोन तुकडे झाले,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
जहाजावर सुमारे 80 प्रवासी आणि 5 क्रू मेम्बर होते.
जेएनपीटी रुग्णालयः 56 रुग्णांची नोंद, त्यापैकी 3 गंभीर, 1 मृत
नेव्ही डॉकयार्ड: 9 जणांची नोद त्यापैकी 8 स्थिर 1 गंभीर
अश्विनी हॉस्पिटल: 1 जण दाखल, प्रकृती अस्थिर
सेंट जॉर्ज हॉस्पिटल: 9 रुग्ण, सर्वांची प्रकृती स्थिर
5 क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
उर्वरित प्रवाशांची सुटका करण्याचं काम सुरू आहे. भारतीय नौदल, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए), तटरक्षक दल, यलो गेट पोलिस स्टेशन आणि मच्छिमार यांच्या तीन पथके बचावकार्यात सहभागी आहेत. गेटवे ऑफ इंडियाच्या पूर्वेला असलेल्या एलिफंटा लेण्यांकडे जाण्यासाठी लोक सार्वजनिक फेरीचा वापर करतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट
“एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.