शरीर आता साथ देत नाही, मला काही झालं तर….' जरांगेंचे मराठा बांधवांना भावनिक आवाहन

शरीर आता साथ देत नाही, मला काही झालं तर….' जरांगेंचे मराठा बांधवांना भावनिक आवाहन


Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत सामूहिक उपोषणाची घोषणा केली आहे. मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करा, गद्दारी कराल तर सामना आमच्याशी आहे, असा इशारा जरांगे यांनी फडणवीसांना दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 16 महिन्यापासून आमचा लढा सुरू आहे.प्रत्येक मराठा समाजाच्या लेकराच हित आरक्षणात आहे. मात्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला आरक्षण दिल नाही म्हणून आम्ही सामूहिक आमरण उपोषण करणार असल्याचे ते म्हणाले. 

मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश पारीत करावा, मराठा आंदोलकांवरील सरसकट केसेस मागे घ्याव्या, शिंदे समिती काम करत नाही, नोंदी शोधत नाही. या समितीला कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश द्यावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. आमच्या मागण्या तातडीने मान्य करा,राज्यातील सगळया मराठा समजला कुणबी आरक्षणाचा कायदा या अधिवेशनात करावा. हैदराबाद, सातारा बॉम्बे गॅझेट लागू करावे,सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी,2004 च्या कायद्यात सुधारणा करावी, असेही यावेळी सांगण्यात आले. जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उद्या सरकारला निवेदन दिले जाणार आहे.

ज्यांना उपोषणात बसायचं ते बसू शकतात. ज्यांना उपोषण सहन होत नाही त्यांनी उपोषणात न बसता उपोषणाला पाठिंबा द्यावा. राज्यातील कुणीही उपोषणात बसू शकतो इतर ठिकाणी उपोषण न करता अंतर वालीत उपोषणाला बसावे.शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देऊन या समितीत मनुष्यबळ वाढवावं.सरकारने तातडीने EWS आरक्षण लागावे मराठा समाजासाठी कुणबी,EWS, हे पर्याय खुले ठेवावे.मराठा समाजाचे जातीचे पुरावे राज्यात कुठेही सापडले तरी नागरीक राहत असलेल्या तालुक्यात त्याला वाटप करण्यात यावे.देवस्थानातील मराठे समाजाचे पुरावे ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी वापरण्यात यावेत, असेही यावेळी सांगण्यात आले. माझं गाव माझी जबाबदारी ही मोहिम मराठ्यांनी हाती घ्यावी,गावा गावात सामूहिक उपोषणासाठी बैठका घ्याव्यात,पत्रिका छापुन एकमेकांना या सामूहिक उपोषणात येण्यासाठी निमंत्रण द्यावे,25 तारखेला कुणाचीही लग्नाची तारीख पकडू नये. तारीख निश्चित केली असेल तर रद्द करा, असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. 

‘अन्यथा तुम्हाला गुडघे टेकायला लावू’

अंतरवालीतील स्थगित केलेलं आमरण उपोषण आम्ही पुन्हा 25 जानेवारी पासून सुरू करणार आहोत. 25 जानेवारीच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा तुमचे डोळे फाटतील एवढे मराठे अंतरवालीत एकत्र येणार, असल्याचा इशारा जरांगे यांनी सरकारला दिलाय. 26 जानेवारी रोजी राज्य सरकारने आमचा सगे सोयरे अध्यादेश काढून एक वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे 25 जानेवारी रोजी सामूहिक उपोषण सुरू करत आहे. 25 जानेवारीच्या आत आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा तुम्हाला गुडघे टेकायला लावू, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. 

‘मराठ्यांच वादळ पुन्हा उसळवा’

सामूहिक उपोषणात येताना मुंबईला जाण्यासारखी तयारी करून या.सगळं साहित्य सोबत आणा,खाण्या पिण्याचे सगळे साहित्य सोबत घेऊन या,घरच्यांच्याविरोधात जाऊन आमरण उपोषण करू नका. 25 जानेवारी रोजी लेकरा बाळासह अंतरवालीत या,मराठ्यांच वादळ पुन्हा उसळवा, मराठा हा सरकारपेक्षा मोठा आहे हे सिद्ध करा,असे आवाहन जरांगे यांनी सरकारला केलंय.

‘मला काही झालं तर…’

या उपोषणात माझा शेवट देखील होऊ शकतो.माझं शरीर आता साथ देत नाही.मला फार त्रास होतो.मला काही झालं तर समाजासाठी योगदान द्या,लढा बंद पडू देऊ नका,असे आवाहन जरांगे यांनी समजाला केले आहे. माझं काहीही होऊ द्या पण मी कधीही मॅनेज होणार नाही, असंही ते पुढे म्हणाले.





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *