मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला निघालेली बोट 18 डिसेंबरला दुर्घटनाग्रस्त झाली. नौदलाच्या बोटीने दिलेल्या धडकेमुळे बोट समुद्रात बुडाली आणि 14 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान जेव्हा बोट बुडू लागली होती तेव्हा बोटीतील काही घाबरलेला पालक आपल्या मुलांचा तरी जीव वाचावा यासाठी त्यांना समुद्रात फेकण्याच्या तयारीत होते. पण सीआयएसएफ मरीन कमांडोच्या टीमने त्यांना रोखलं आणि प्रत्येकाला वाचवलं जाईल असं आश्वासन दिलं.
दुर्घटनेनंतर सीआयएसएफ कॉन्स्टेबल अमोल सावंत (36) आणि त्यांचे दोन सहकारी सर्वात प्रथ्म घटनास्थळी पोहोचले होते. जवळपास दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांची गस्त बोट तिथे आले होते. यावेळी त्याने गोल्डन अवरचा जास्तीत जास्त उपयोग करुन घेत लहान मुलांसह सर्वात असुरक्षित प्रवाशांना प्रथम वाचवण्याचा निर्णय घेतला.
18 डिसेंबरला नौदलाच्या बोटीने एलिफंटाच्या दिशेने निघालेल्या निलकमल या फेरी बोटला धडक दिली. दुपारी 3.30 च्या आसपास ही दुर्घटना घडली होती. “आम्ही समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर बोटीतून गस्त घालत होतो. यावेळी आम्हाला वॉकी टॉकीवर एक बोट बुडत असल्याची माहिती मिळाली. मी पायलटला (स्पीड बोट ड्रायव्हर) वेगाने चालवण्यास सांगितलं. 3 ते 4 किमी अंतरावर असणाऱ्या घटनास्थळी आम्ही तात्काळ दाखल झालो,” अशी माहिती सावंत यांनी पीटीआयला दिली.
पुढे त्यांनी सांगितलं की, “अपघाताचे ठिकाण पाहून आश्चर्यचकित झालो. पण एक प्रशिक्षित सैनिक असल्याने मला नेमकं काय करायचं होतं हे माहिती होतं. आम्ही पाहिले की लोक मुलांचा जीव वाचवण्याच्या हेतूने त्यांना बुडत्या जहाजातून समुद्रात टाकण्यास तयार आहेत. मी त्यांना घाबरू नका आणि हा प्रयत्न करू नका असं सांगितलं. आम्ही लवकरच परिस्थिती हातात घेतली,” अशी माहिती त्यांनी दिली. अमोल सावंत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT), नवी मुंबईचे रक्षण करणाऱ्या CISF युनिटमध्ये तैनात आहेत.
सावंत म्हणाले की, “जेव्हा मी घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुलं आणि त्यांचे पालक बुडत्या बोटीत सहाय्य मिळेल त्याला पक़डून लटकत असल्याचं पाहून हादरलो. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मुलांना पकडले आणि त्यांना आमच्या बोटीत आणलं,” अशी माहिती त्यांनी दिली आहे. जवानाचे म्हणणे आहे की त्यांनी प्रथमतः 6-7 मुलांची सुटका केली आणि त्यानंतर महिला आणि पुरुषांची सुटका केली.
“आमच्या दिशेने अनेक हात आले होते. काही ओरडत होते, काही फक्त त्यांना वाचवण्याची विनंती करत होते. नेमके किती हे आम्हाला माहित नाही परंतु आम्ही त्या दुर्दैवी फेरीत बसलेल्या 50-60 लोकांना मदत करु शखलो आणि वाचवू शकलो,” अशी माहिती सावंत यांनी दिली आहे.
जेएनपीएला दहशतवादविरोधी सुरक्षा कवच पुरवणाऱ्या सीआयएसएफ युनिटमध्ये तैनात असलेले उपनिरीक्षक (एसआय) खियोका सेमा (३८), घटनास्थळी पोहोचलेल्या दुसऱ्या गस्ती बोटीत होते. “मी लाइफ जॅकेट घातलेली एक बाई पाण्यात पाहिली. पण तिची सुटका होईल या अपेक्षेने तिने हात वर केले होते. आम्ही तिच्याकडे धाव घेतली आणि हळूवारपणे तिला हात खाली ठेवण्यास सांगितले अन्यथा जॅकेट घसरेल आणि ती बुडू लागेल,” असं सेमा यांनी सांगितलं. अखेर तिला वाचवण्यात आलं.
2018 मध्ये निमलष्करी दलात सामील झालेल्या SI सेमा यांनी सांगितले की, त्यांनी 10-12 व्यक्तींना पुन्हा शुद्धीवर आणण्यासाठी आणि पाणी बाहेर काढण्यासाठी त्यांना कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) दिले. सीआयएसएफचे दोन कर्मचारी, जे अधिकृत कामासाठी दिल्लीत आले होते, त्यांनी सांगितले की नौकेवरील एका परदेशी जोडप्याने चांगले नागरिक म्हणून काम केलं आणि मदतीसाठी पुढे येऊन अनेक पीडितांना सीपीआर दिलं.
“आम्ही 300 मीटरच्या परिसरात कोणी जिवंत आह आहे का याचा शोध घेतला. आमच्या टीमने ‘नील कमल’च्या प्रवाशांच्या बॅग, लाइफ जॅकेट आणि इतर सामानही गोळा केले,” असं सेमा यांनी सांगितलं.