ऑफिसमध्ये एकमेकांशी संवाद साधण्यासाठी संवाद कौशल्य असणं फार गरजेचं असतं. पण आता काळ बदलत चालला असला तरी अद्यापही अनेक कार्यालयांमध्ये जुन्या पारंपारिक प्रथांचंच पालन केलं जातं. म्हणजे जेव्हा वरिष्ठांना संबोधित करायचं असतं तेव्हा त्यांचा सर म्हणून उल्लेख करणं अपेक्षित असतं. या प्रथा देशांप्रमाणे बदलत जातात. पण आता संपूर्ण जग एकत्र आल्याने प्रत्येक ठिकाणी कामाच्या प्रथाही बदलत आहेत. पण काहीजण त्यातच अडकून पडतात आणि या गोष्टी मनालाही लावून घेतात.
योग्य प्रकारे न केल्यास अगदी अर्थपूर्ण लिंक्डइन मेसेजदेखील वादाला सुरुवात करू शकतो, लेखक आणि ब्लॉगर साकेतने अलीकडेच X (पूर्वी Twitter) वर एका पोस्टमध्ये हा मुद्दा अधोरेखित केला आहे. साकेतने त्याच्या अल्मा माटरच्या नुकत्याच पदवीधर झालेल्या एका संभाषणाबद्दल सांगितला, ज्यांना थेट नावाचा उल्लेख करणं पटलं नाही.
साकेतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने सांगितलं की, “मला हवं तर जुन्या विचारांचा म्हणा, पण 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या एका सहकाऱ्याने मला लिंक्डइनवर मेसेज केला आणि म्हटलं की, ‘हाय साकेत, आपण दोघंही एकाच कॉलेजचे आहोत’. तिथेच त्याने मला गमावलं. मुला तू 2025 मध्ये उत्तीर्ण झाला आहेस आणि 1994 मध्ये उत्तीर्ण झालेल्याला पहिल्या नावाने हाक मारतोस? मी अद्यापही 1993 मध्ये उत्तीर्ण झालेल्यांना सर म्हणतो. ही अमेरिकन संस्कृती”.
Call me old fashioned but had connected with a young fresh 2025 pass out from my college when he sent message on LinkedIn. His first message started with – Hi Saket, we are from same college…. And he lost me there itself. Son, you are 2025 pass out and address 1994 pass out with…
— saket साकेत @saket71) December 17, 2024
ही पोस्ट नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी यावर कमेंट करत आपलं मत व्यक्त केसं. तसंच यानिमित्ताने कोण योग्य आणि कोण चूक असं चर्चासत्रही रंगलं आहे.
“कॉलेज आणि एकाच समुदायातील लोक जर आमचयापेक्षा मोठे असतील तर आम्ही सहसा आदराने अभिवादन करतो (सर/भाऊ/दादा/अण्णा/…),” असं पोस्टचे समर्थन करणाऱ्या एका युजरने सांगितलं आहे.
“15 वर्षांनंतरही माझ्या कॉलेजच्या सीनिअर्सना सर म्हणतोय, त्यांच्यापैकी काही माझ्यासोबत एकाच वेळी कामावर रुजू झाले आहेत. काही कनिष्ठ पदावर आहेत; मी त्यांच्या बॉसला पहिल्या नावाने हाक मारतो, पण कॉलेजचे सीनियर आयुष्यभर सर असतात,” असं एकाने लिहिलं आहे,
“आम्ही 65 वर्षांच्या वृद्धांना त्यांच्या नावाने संबोधतो. हे अजिबात अनादर करणारे नाही. हे फक्त कंडिशनिंगबद्दल आहे असं मी म्हणेन,” असं एकजण म्हणाला आहे.