उद्धव ठाकरे यांचा एक निर्णय काँग्रेस आणि शरद पवार पक्षाचे टेन्शन वाढवणार?

उद्धव ठाकरे यांचा एक निर्णय काँग्रेस आणि शरद पवार पक्षाचे टेन्शन वाढवणार?


Shivsena Uddhav Balasaheb Thackeray :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महापालिका झेडपी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या एकला चलो रे च्या भूमिकने महाविकास आघाडीत खळबळ माजलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही काँग्रेसही स्वबळाचा निर्णय घेऊ शकते असं सांगून एकप्रकारे ठाकरेंना प्रतिआव्हान दिलंय.

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीत आता मतमतांरे दिसू लागलीयेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी केलीय. मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघात नेमलेल्या निरीक्षकांनी दिलेल्या अहवालात स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिक उत्सुक असल्याचं सांगण्यात आलंय.

उद्धव ठाकरेंच्या या चाचपणीवर काँग्रेस आक्रमक झालीय. त्यांनी स्वबळावर लढावं की नाही हा त्यांचा निर्णय असल्याचं नाना पटोले म्हणालेत.महाविकास आघाडीत झालेल्या अपमानानंतर आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाला स्वबळाची सुबुद्धी सूचल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय. 

विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मविआच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्हं निर्माण झालंय. महापालिका, झेडपीच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतल्यास मविआचं अस्तित्वच मोडीत निघण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईतील विधानसभा निहाय आढावा घेण्यासाठी 36 विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. यानुसार 227 वार्डचा आढावा निरीक्षकांनी घेतला असून आज त्याचा अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे निरीक्षक सोपवणारेत.

निरीक्षकांमध्ये विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सुनील राऊत, अमोल कीर्तिकर यासह अनेकांचा समावेश होता. विधानसभेतील पराभवानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी असं अनेक पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. त्यानुसार निरीक्षकांनी 36 विधानसभा निहाय वॉर्डची आणि शाखांची भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली  त्यानंतर त्याचा अहवाल आज उद्धव ठाकरेंकडे सोपवला जाणार आहे 

शिवसेना संपवण्यात आमदार आदित्य ठाकरेंचा मोठा वाटा असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केलाय.. उद्धव ठाकरेंना महायुतीसोबत येयचं होतं..मात्र आदित्य ठाकरेंना काँग्रेससोबत जायचं असल्यामुळे महायुती होऊ शकली नसल्याचा खळबळजनक दावा दीपक केसरकरांनी केलाय.





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *