
T20 World Cup 2026 : आगामी T20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे ठिकाणही निश्चित करण्यात आले आहे. अंतिम सामना 8 मार्च रोजी, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आता यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी टीका केली आहे. प्रत्येक महत्त्वाचा सामना अहमदाबादलाच का? मुंबईला ऐतिहासिक पार्श्वभूमी असताना तिथे का अंतिम सामना खेळवला जात नाही? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला.
आगामी टी 20 विश्वचषकाचा एक उपांत्य सामना हा मुंबईला तर दुसरा उपांत्य सामना हा कोलकाता किंवा श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना हा अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. या आधी एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामनाही अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला होता.
T20 World Cup 2026 Final Match : मुंबई का नाही?
आदित्य ठाकरे यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आयसीसीला काही प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले की, प्रत्येक अंतिम सामना हा अहमदाबादमध्ये खेळवला जात आहे. क्रिकेटची अशी कोणती पार्श्वभूमी त्या शहराला आहे? मुंबईत अंतिम सामना का खेळवण्यात आला नाही?
आयसीसीने (ICC) राजकारण किंवा पक्षपातीपणापासून दूर राहावे, अशी अपेक्षा आहे. ईडन गार्डन्स–कोलकाता, एम.ए. चिदंबरम स्टेडियम–चेन्नई, आय.एस. बिंद्रा–मोहाली ही सर्व मैदानं टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी योग्य आहेत. पण यामध्ये राजकारण केलं जात असल्याने आपल्यावर अन्याय होतो अशी भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
So the T20 World Cup fixture is out.
Guess where the Final is scheduled?
Ahmedabad.What’s this fascination of pulling every single final there? Has this been a traditional cricket venue?
Why not Mumbai?
Wankhede will be the absolute best venue for a T20 World Cup final.… pic.twitter.com/thezl9QIz0
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 25, 2025
T20 World Cup 2026 Timetable : विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा
आयसीसीच्या आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या वेळापत्रकाची मुंबईत घोषणा करण्यात आली. हा विश्वचषक 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत खेळवण्यात येत आहे. या विश्वचषकाचा अंतिम सामना 8 मार्चला अहमदाबादमध्ये खेळवण्यात येईल.
या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघांचा समावेश एकाच गटात करण्यात आला आहे. उभय संघांमधला सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत खेळवण्यात येईल. या विश्वचषकाच्या अ गटात भारत आणि पाकिस्तानसह अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबिया संघांचा समावेश आहे.
T20 World Cup 2026 Full Schedule : विश्वचषकाचे गट कोणते?
गट अ: भारत, पाकिस्तान, यूएसए, नेदरलॅंड्स, नामिबिया
गट ब: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान
गट क: इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली
गट ड: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई
T20 World Cup 2026 India Matches : भारताचे सामने कधी?
15 फेब्रुवारी भारत विरुद्ध पाकिस्तान
7 फेब्रुवारी भारत विरुद्ध अमेरिका (मुंबई वानखेडे)
12 फेब्रुवारी भारत विरुद्ध नामिबिया (नवी दिल्ली)
18 फेब्रुवारी भारत विरुद्ध नेदरलँड्स (अहमदाबाद)
ही बातमी वाचा:
आणखी वाचा