
Aastad Kale Shared Post On Rohit Arya: मुंबईतील (Mumbai News) पवईत (Powai) घडलेल्या घटनेनं सर्वांनाच हादरवलं आहे. पवईतील महावीर क्लासिक इमारतीमध्ये असणाऱ्या आर. ए. स्टुडिओत रोहित आर्य (Rohit Aary) नावाच्या व्यक्तीनं तब्बल 17 मुलांसह 20 जणांना ओलीस ठेवलेलं. संपूर्ण शहरात बातमी पसरली आणि खळबळ माजली. वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी मुलांना बोलावण्यात आलेलं. पण, त्यानंतर जे घडलं ते खरंच अंगावर काटा आणणारं होतं. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. स्टुडिओत शिरलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यवर गोळी झाडली आणि एन्काउंटर केला. थेट छातीत गोळी लागल्यानं आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. पण, त्यानंतर आरोपी रोहित आर्यच्या एन्काउंटरवरुन अनेक प्रश्न विचारण्यात आले. सोशल मीडियावरही अनेकांनी याप्रकरणी संशय व्यक्त केला. कारण, रोहित आर्य पहिल्यापासूनच सरकावर गंभीर आरोप करत होता. त्यामुळे रोहित आर्यच्या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच आता मराठी अभिनेता अस्ताद काळेनंही (Astad Kale) याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे म्हणजे, मराठी मनोरंजनविश्वातला गाजलेला चेहरा. मराठी मालिकांमध्ये त्यानं अनेक उल्लेखनिय भूमिका साकारल्या आहेत. अशातच तो ‘बिग बॉसमध्येही दिसून आलेला. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तसेच, राजकीय असो वा इतर काहीही प्रत्येक विषयांवर आपलं मत नेहमीच मांडत असतो. अशातच आता आस्ताद काळेनं पवईतील रोहित आर्य प्रकरणावरही सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तसेच, मोठा संशय व्यक्त केला आहे.
आस्ताद काळे सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये काय म्हणाला?
अभिनेता आस्ताद काळेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. रोहित आर्यनं मुलांना ओलीस ठेवल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलेला आणि आपल्या मागण्या सांगितलेल्या. तोच व्हिडीओ आस्तादनं शेअर केलाय आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “कोणालाही असं ओलीस धरणं हे चुकीचंच आहे. हा शेवटचा मार्ग “आपलं म्हणणं ऐकलं” जावं म्हणून अवलंबावा लागणं हे दुर्दैवी आहे आणि पायात/दंडात गोळी घालून त्याला ताब्यात न घेता Vital Organs ना निशाणा बनवणं हे संशयास्पद आहे. एवढंच…”
आस्ताद काळेनं पोस्टच्या शेवटी लिहिलंय की, “बाकी… जय हिंद… जय महाराष्ट्र! ता.क:- हे असेच आपले आवाजही बंद करायला येतील. बागुलबुवा खरा ठरेल.”
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा