Headlines

थकीत पाणी देयकांमधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 75% सूट देणारी अभय योजना जाहीर

थकीत पाणी देयकांमधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 75% सूट देणारी अभय योजना जाहीर Oplus_131072
थकीत पाणी देयकांमधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 75% सूट देणारी अभय योजना जाहीर

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच मोरबे धरण ते कळंबोली दरम्यान असलेल्या मुख्य जलवाहिनीवरील ग्रामपंचायतींकडील पाणी देयक थकीत असलेले ग्राहक यांच्याकडील थकीत पाणी देयक वसूली करण्याच्या दृष्टीने थकीत पाणी देयक ग्राहकांकरिता एकूण थकीत पाणी देयकामधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर ७५% सूट देण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘अभय योजना’ लागू करण्यात येत आहे.

सध्या माहे जून – जुलै २०२४ या कालावधीत पाणी देयके वितरित करण्यात येत असून या देयकात नमूद केलेली थकीत पाणी देयकातील मूळ रक्कम व विलंब आणि दंडात्मक शुल्काची २५% रक्कम भरल्यास विलंब व दंडात्मक शुल्काची ७५% रक्कम माफ होणार आहे. त्यासाठी संपूर्ण थकीत पाणी देयक रक्कम माहे जून-जुलै २०२४ देयकाच्या विहित मुदतीत भरणा केल्यास सदर अभय योजनेचा लाभ मिळणार आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच मोरबे धरण ते कळंबोली दरम्यान असलेल्या मुख्य जलवाहिनीवरील ग्रामपंचायतींकडील थकीत पाणी देयक ग्राहक यांना सूचित करण्यात येते की, ऑनलाईन पाणी देयक भरणेकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या https://www.nmmc.gov.in या वेबसाईटचा वापर करावा. यासोबतच नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि सर्व 8 विभाग कार्यालयांमधील पाणी देयक भरणा केंद्र व बेलापूर येथील गौरव म्हात्रे कला केंद्र आणि नेरुळ सेक्टर-44 जलकुंभ संकुल येथेही पाणी देयक भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे याची नोंद घेण्यात यावी.
तरी संबंधित पाणी देयक ग्राहकांनी, या ‘अभय योजना’ सवलतीच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व थकीत पाणी देयक रक्कम तात्काळ भरणा करून पुढे होणारी कायदेशीर कारवाई टाळावी आणि नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *