Headlines

अभिनेते आषिश वारंग यांचं निधन; सिंबा, मर्दानीसारख्या हीट सिनेमात पोलिसाच्या भूमिका गाजल्या

अभिनेते आषिश वारंग यांचं निधन; सिंबा, मर्दानीसारख्या हीट सिनेमात पोलिसाच्या भूमिका गाजल्या
अभिनेते आषिश वारंग यांचं निधन; सिंबा, मर्दानीसारख्या हीट सिनेमात पोलिसाच्या भूमिका गाजल्या


मुंबई : मराठी सिनेसृष्टीवर (Bollywood) काही दिवसांपूर्वी शोककळा पसरली होती, आता सिनेसृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. मराठी आणि हिंदी सिनेमातून (Cinema) प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 55 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वारंग यांनी बिग बी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आमीर खान, रणवीर सिंग यांच्यासह अनेक दिग्गज कलाकांसोबत काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विशेषत: पोलिसाच्या भूमिकेतूनच त्यांना चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली होती. विशेष म्हणजे अभिनयात येण्यापूर्वी ते हवाई दलात अधिकारी होते. 

आशिष यांचे बंधू अभिजीत वारंग यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे आशिष यांच्या निधााची माहिती दिली. “वारंग आशिष दादा, तुम्हाला खूप मिस करू. प्रथम तुम्ही हवाई दल अधिकारी म्हणून देशाची सेवा केली आणि नंतर अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. आम्ही एक चांगला माणूस गमावला आहे.”, असे अभिजीत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. आशिष यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीसह सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. 

सूर्यवंशी‘, ‘सर्कस‘, ‘मर्दानी’, ‘सिंबा‘, ‘एक व्हिलन रिटर्न्स‘ अशा गाजलेल्या हिंदी सिनेमांत ते झळकले असून त्यांनी साकारलेल्या सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेला चाहत्यांचीही मोठी पसंती मिळाली आहे. त्यामुळे, आशिष वारंग यांच्या निधनानंतर अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून चाहत्यांनाही शोक अनावर झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून ते आजारी होते, आज 5 सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे.

हेही वाचा

वंचितचे नेते राजेंद्र पातोडेंच्या मुलावर जीवघेणा हल्ला; अकोल्यात समर्थकांकडून घराची तोडफोड, कारही जाळली

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *