Headlines

दिलासादायक! मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो 

दिलासादायक! मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो 
दिलासादायक! मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो 


Mumbai Rain : मुंबईकरांसाठी (Mumbai)  दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावाची क्षमता 8.4.60 कोटी लिटर आहे. यंदा हा तुळशी तलाव आज म्हणजे 16 ऑगस्टला पूर्ण क्षमतेनं भरला आहे. मुंबईला पाणी देणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या 90.16 टक्के म्हणजेच 130498.1  कोटी लिटर पाणी उपलब्ध आहे. यामुळं आगामी दिवसात पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण परिसरात जोरदार पाऊस

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुनवाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. तर काही ठिकाणची धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळं आता मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. 

16 ते 21 ऑगस्टदरम्यान राज्यात अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता 

सध्या राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवसात 16 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून ही माहिती देण्यात आली आहे.  विदर्भासह मध्य महाराष्ट्र व कोकणात हवामान विभागाने हाय अलर्ट दिले आहेत. मराठवाड्यात पुढील चार दिवस काही जिल्ह्यात पावसाची हजेरी राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा  सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने वर्तवली आहे. 

अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे मध्य महाराष्ट्र ,कोकण ,गोवा या भागात जोरदार पावसाची शक्यता

अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे मध्य महाराष्ट्र ,कोकण ,गोवा या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे .पुढील दोन दिवस मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. राज्यभर पावसाचा जोर पुढील तीन दिवस काहीसा कमी होणार असून पुन्हा हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही भागात जास्त पाऊस झाल्यामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे उभी पिकं पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी तातडीनं पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत. 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *