ajit dada plane crash : अजितदादा विमान अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, माजी मंत्र्याने केली मागणी

ajit dada plane crash : अजितदादा विमान अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, माजी मंत्र्याने केली मागणी
ajit dada plane crash : अजितदादा विमान अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, माजी मंत्र्याने केली मागणी


जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीला येत असताना विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राजकारण ढवळले आहे. या अपघाताचा घटनाक्रम आणि त्यानंतर अनेक नेत्यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघातात सुरुवातीला अजितदादांसह सहा जण ठार झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांना प्रसारित केले होते. तसेच वैमानिकाच्या बद्दलही चुकीची माहिती प्रसारित केली होती. त्यावरुन अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त केला आहे.आता यास दुजोरा देत एका माजी मंत्र्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूवरुन राज्यात काहुर माजले आहे. हा अपघात DGCA ने च्या माहितीनुसार धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने झाल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये धुके दिसत नसल्याचे संशय व्यक्त केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी या अपघाताची बातमी मीडियाला देताना सरकारने सहा जण ठार झाल्याची माहिती आधी जारी केली होती. त्यामुळे तशाच बातम्या सुरुवातीला प्रसारित झाल्या होत्या.विमान जळून खाक झाल्याने ती सहावी व्यक्ती कुठे गेली ? असा सवाल मिटकरी यांनी केला होता.

भाजपाचे माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असलेल्या एकनाथ खडसे यांनीही या अपघातावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. ते म्हणाले की अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य असून विमान अपघातातला सहावा माणूस कोण ? आणि तो कुठे गेला ? असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत अनेक शंका उपस्थित होत असल्याने आता याप्रकरणी न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी खडसे यांनी केली आहे.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही नाही

अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब दिसत नाही. अर्थसंकल्पात फक्त मोठ्या घोषणा आहेत. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.अर्थसंकल्पात दाखवण्यात आलेली तूट आणि त्याची भरपाई नेमकी कशातून केली जाणार याचा उल्लेख नाही.शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं काहीही या अर्थसंकल्पात नाही अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *