Headlines

Ajit Pawar | अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची माहिती

Ajit Pawar | अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची माहिती
Ajit Pawar | अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची माहिती

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी राज्यसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आरजेडीचे खासदार मनोज कुमार झा यांनी या घटनेबाबत केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. मनोज कुमार झा यांनी विमान वाहतूक मंत्रालयाला प्रश्न विचारताना, या अपघातानंतर विमान सुरक्षा व्यवस्थेत काही सुधारणा करण्यात येणार आहेत का? असा सवाल उपस्थित केला. तसेच या प्रकरणाच्या तपासाबाबत सरकारची भूमिका काय आहे, याबाबतही त्यांनी माहिती मागितली. यावर उत्तर देताना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी सांगितले की, या संपूर्ण घटनेचा पारदर्शक आणि सखोल तपास एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) मार्फत केला जात आहे. तपासाची प्रक्रिया कशी असावी हे भारत नव्हे, तर आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार ठरवले जाते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून त्यानुसार पुढील निर्णय घेतले जातील, असेही नायडू यांनी स्पष्ट केले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *