Headlines

मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?

मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?
मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?



पुणे : राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी (Election) उद्या 2 डिसेंबर रोजी मतदान होत असून आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी आणखी एक दिवस मिळाल्याने प्रचाराची रंगत वाढली आहे. तर, राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांनी आजही सभांचं नियोजन केलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी पुण्यातील (Pune) राजगुरुनगर येथून सभेला संबोधित केले. यावेळी, आज निवडणुकाचा आदला दिवस आहे, आजच्या रात्री मतदार जागे असतात, असे म्हणत मिश्कील टीपण्णी केली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही लक्ष्मीदर्शन होणार आहे, बाहेर झोपा असे म्हणत फटकेबाजी केली होती. 

राज्यातील बहुतांश नगरपालिकांमध्ये नगरसेवकांच्या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, उद्या 2 डिसेंबर रोजी उर्वरीत सर्वच नगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत असून मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सभेला संबोधित करताना अजित पवारांनी मतदारांच्या मानसिकतेवर भाष्य करत उमेदवारांना सल्ला दिला. उमेदवारांनो आजची रात्र डोळ्यात तेल घालून पाहा. मतदार आदल्या रात्री खूप विचार करत असतात, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारही जागे असतात. घराबाहेर आवाज आला की आतून मतदार म्हणतो, होय-होय मी जागा आहे. कोणाला मतदान करायचं हे विचार करतोय, असे म्हणत अजित पवारांनी मतदारांच्या मानसिकतेवर भाष्य करत मिश्कील टीपण्णी केली. यावेळी, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

मी कामाचा माणूस आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मात्र, काही लोकं माझ्यावर आरोप करतात. मी असा आहे, तसा आहे, 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. पण मी एक रुपयांचा मिंदा नाही. तुम्ही दाखवून द्या, की मी कामं करताना कोणाकडून पैसे घेतले किंवा चिरीमिरी द्यावी लागली. याउलट प्रशासन मला टरकून राहतं, असेही अजित पवारांनी म्हटले. 

हिवाळी अधिवेशनात प्रश्न मार्गी लावतो

येत्या हिवाळी अधिवेशनात तुमचा प्रश्न मार्गी लावतो. आता आचारसंहिता असल्यानं मला स्पष्टपणे बोलता येणार नाही. मात्र, या अधिवेशनात तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी किती निधी लागेल, त्यासाठी काय करावं लागेल हे पाहतो. पण, आचारसंहितेमध्ये मला यावर बोलता येणार नाही. तुम्ही माझं ऐकलं तर मी तुमचं ऐकेन. परत म्हणाल मी दम दिला म्हणून. त्यामुळे, तुम्ही माझी विनंती ऐकली तर मी तुमची विनंती ऐकेन, असा मिश्कील टोलाही अजित पवारांनी लगावला.

हेही वाचा

मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *