
Akshay Waghmare Wife Yogita Gawali Pregnant: मराठीतील लोकप्रिय अभिनेत्याच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. अभिनेता अक्षय वाघमेरेची (Akshay Waghmare) पत्नी योगिता दुसऱ्यांदा गरोदर असून तिच्या डोहाळे जेवणाचे (Baby Shower) फोटो समोर आले आहेत. या डोहाळे जेवणाच्या फोटोंनी लक्ष वेधलंय. सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत अक्षयने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. अक्षय वाघमेरेची पत्नी योगिता म्हणजे, कुख्यात डॉन, माजी आमदार अरूण गवळीची (Arun Gawli) दुसरी कन्या. म्हणजेच, मराठी अभिनेता अक्षय वाघमारे डडींचा जावई आहे.
कुख्यात डॉन अरुण गवळी आणि त्यांची पत्नी आशा गवळी आता आजी-आजोबा होणार आहेत. योगिताचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम नुकताच पुण्यात पार पडला. थाटामाटात पार पडलेल्या बेबी शॉवरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. अक्षय-योगिताच्या आयुष्यात पुन्हा एकदा चिमुकल्या पावलांनी नवा पाहुणा येणार असल्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
बेबी शॉवरसाठी योगिताचा खास लूक
डॅडींची लेक आणि मराठी अभिनेता अक्षय वाघमेरेची पत्नी योगिता दुसऱ्यांदा आई होणार आहे. नुकतंच तिचं डोहाळे जेवण थाटामाटात पार पडलं. यावेळी योगिता आणि अक्षय यांनी ट्विनिंग केलेलं. योगितानं खऱ्या फुलांची ज्वेलरी वेअर केलेली. ‘मॉम टू बी…’ योगिता खूपच सुंदर दिसतेय. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून बेबी शॉवरचे काही फोटो शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.
अक्षय, योगितानं लॉकडाऊनमध्ये बांधलेली लग्नगाठ
गँगस्टर अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारेनं गेल्या वर्षी 8 मे रोजी आपली लग्नगाठ बांधलेली. लॉकडाऊनमधील सर्व नियमांचं पालन करुन लग्न पार पडलेलं. महत्त्वाची बाब म्हणजे, दोघांचा लग्नसोहळा दगडी चाळीतच पार पडलेला. अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे आणि इतर समारंभाचे फोटो शेअर केले होते. 2019 च्या डिसेंबर महिन्यातच दोघांचा साखरपुडा झालेला. तेव्हाच लग्नाची तारीखही नक्की करण्यात आलेली. 29 मार्च 2020 मध्ये लग्न होणार होतं. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अचानक लॉकडाऊन लागलं आणि लग्न पुढे ढकललेलं. अखेर 8 मे 2020 रोजी दोघांचा लग्नसोहळा पार पडलेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा